Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

कुत्र्याने चावा घेतलेल्या बालकाला ५१ हजारांची मदत

लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला मदतीचा हात
जखमी गणेशच्या मदत पालकांकडे सुपुर्द करताना स.पो.नि.राहुल वाघ व लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विंचूर दि‌.१०(प्रतिनिधी) पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या बालकाला लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या कडून (५१०००) एक्कावन्न हजार रुपयांची मदत देण्यात आली.सदर मदतीची रक्कम लासलगांव पोलीस ठाण्याचे स.पो.निरी.राहुल वाघ यांच्या हस्ते गणेशच्या पालकांकडे सुपुर्द करण्यात आली. लासलगांव उड्डाणपूला जवळ रहात असलेल्या गणेश नामदेव सोनवणे या पाच वर्षीय बालकाला गत सप्ताहात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता.यामध्ये गणेश हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर विंचूर येथील साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.व शस्त्रक्रियेसह सर्व खर्च एक लाख रुपयांच्या आसपास आहे. मात्र गणेशच्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः काही रक्कम व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने (५१०००) एक्कावन्न हजार रुपये जमा करून या जखमी बालकाच्या उपचारासाठी दिले. लासलगावच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने केलेल्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे. जोपासणाऱ्या याप्रसंगी लासलगाव पोलीस ठाण्याचे स.पो.निरी.राहुल वाघ, साई सेवा हॉस्पिटलचे डॉ योगेश आहेर, राजेश पल्हार, राकेश पठारे,राम साळवे,उमर सैय्यद, तुषार बोरसे, योगेश क्षीरसागर, इम्रान सैय्यद,आजिम शेख, प्रविण सोनवणे, कृष्णा बर्डे गणेश महाले आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
खाकी वर्दीतील माणूसकीचे दर्शन गणेशच्या उपचारासाठी यापुढे येणारा जो काही खर्च असेल तो सर्व खर्च करण्याची जबाबदारी लासलगाव पोलीस ठाण्याचे स‌.पो.निरी.राहुल वाघ यांनी स्वतः कडे घेतली. त्यांच्या या कृतीने खाकी वर्दीतील माणूसकीचे दर्शन झाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.