परमपूज्य तुकारामबाबा विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उत्साहात
January 10, 2023
0
विंचूर दि.१०(प्रतिनिधी)
खेडले झुंगे (ता.निफाड) येथील म.वि.प्र. समाज संस्थेच्या परमपूज्य तुकाराम बाबा विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सभासद यादव सदाफळ, विजय गीते, रामदास घोटेकर,धर्मा घोटेकर, अभिषेक घोटेकर आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व शास्त्रज्ञांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य ए. के.उगले हे होते. खेडले झुंगे केंद्रप्रमुख गुजर यांनी प्रदर्शनास भेट दिली. विद्यालयातील उपशिक्षक एस. व्ही.पगार यांनी शालेय विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व विषद केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक एस.के. शिंदे, विज्ञान शिक्षक साबळे, पगार, जाधव ,श्रीमती पगारे, वरिष्ठ लिपिक, भाऊसाहेब धोंगडे, डी.बी. खडताळे, पगार सर, चांदे, दिघे, श्रीमती आजादे श्रीमती. पगार, गीते, सानप, वावधाने, डमाळे, गोसावी आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन देविदास भारती यांनी केले तर उपशिक्षक एम .यू. साबळे यांनी आभार प्रदर्शन केले.

