Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी

मरळगोईला बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी विंचूर
ता. मरळगोई खुर्द (ता.निफाड)येथे मेंढपाळ मेंढ्या चारत असतांना बिबट्याने हल्ला केल्याने जखमी झाला. मरळगोई खुर्द येथील रानात भाऊसाहेब रामभाऊ जाधव (वय ४०) हे ता.०७ रोजी मेंढ्या चारत असतांना जाधव यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला करून जबरी दुखापत केल्याची घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. हल्ल्यात भाऊसाहेब जाधव यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून बिबट्याचे चार दात लागल्याचे खूण असून चेहऱ्यावर पंजाने ओरखडले आहे. दुखापत गंभीर असल्याने जाधव यांना लासलगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले.त्यानंतर निफाड रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सदरच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वनविभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.