सोशल मीडियाच्या माध्यमातून ३० वर्षांनी एकत्र आलेत व्यवसाय प्रशिक्षणार्थी
January 01, 2023
0
नाशिक (प्रतिनिधी)-
सन १९९० साली नाशिकच्या सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पेंटर जनरल या व्यवसाय वर्गात १७ प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. दोन वर्ष कालावधी असलेला हा कोर्स करतांना एकमेकांशी मैत्रीचे नाते त्यांच्यात निर्माण झाले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर काही जण विविध कंपन्यामध्ये जॉईन झाले. तर काहिंना सरकारी नोकरी तर काही अन्य व्यवसाय करत आहेत. स्वतः चे करियर करण्यात बरेच वर्ष निघून गेले. मात्र पुणे येथील टेल्को कंपनीत कार्यरत असलेले राजेश हजारें यांनी सर्वांना एकत्र आणण्याचा ध्यास घेतला, आणि त्यांदृष्टीने त्यांनी फेसबुक च्या माध्यमातून प्रत्येकाचा शोध घेतला. यास बराच कालावधी लागला अखेर सर्वांचा शोध लावण्यास राजेश हजारे यास यश मिळाले. मग काय त्यांनी व्हाट्सअप वर सर्वांचा ग्रुपही तयार केला. त्यामुळे एकमेकांशी सम्पर्क साधने अतिशय सोपे झाले. एकमेकांशी चॅटींन्ग सुरु झाले. आणि त्यातूनच आपण सर्व एकत्र आलो तर हा आंनद किती द्विगुणित होईल याबाबत सर्वांना उत्सुकता निर्माण झाली. यासाठीही राजेश हजारे यांनीच पुढाकार घेतला. सर्वांनी एकत्र येण्याचा दिवस आणि ठिकाण ठरवले. त्याप्रमाणे शुक्रवार दि.३० डिसेंबर २०२२ रोजी काही जण वगळता सर्व प्रशिक्षणार्थी आय टी आय सातपूर येथे एकत्र आले. आपण ज्या वर्गात प्रशिक्षण घेतले तेथे भेट दिली. वर्गमित्र असलेले त्याच वर्गात शिक्षक असलेले शरद राऊत सर यांनी सर्वांचे स्वागत केले. सर्वांनी वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी जुन्या आठवणींना सर्वांनी उजाळा दिला. आय टी आय चे प्राचार्य श्री. मुंडासे सर व उप प्राचार्य श्री. तेलंगी सर यांची भेट घेऊन सर्वांनी आपापला परिचय करवून दिला.
यावेळी सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.दुपारच्या सत्रात कैलासवासी झालेले श्री वाघमारे सर व सहकारी प्रदिप देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्वांची आय टी आय झालेनंतरची मनोगते ऐकत स्नेहभोजन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे समारोप वर्गमित्र देविदास पगारे यांचा वाढदिवस केक कापुन साजरा केला. व
या प्रसंगी वर्गमित्र संदिप देशपांडे ( के.एस बी पम्प्स) श्रीराम बोराडे ( सुंदरम आर्ट) आत्माराम फडकर ( महिन्द्रा अँन्ड महिन्द्रा) राजेश हजारे (टाटा मोटर्स ) भाऊसाहेब हुजबंद (पत्रकार) दादाजी जगताप (टाटा मोटर्स ) विनोद जाधव ( फर्निचर ऊद्योग) राजु नांगरे ( बिल्डिंग पेन्टींग ) प्रशांत कुलकर्णी (प्रगतशील शेतकरी ) शरद राउत ( शिल्प निदेशक रंगारी जनरल) बाळासाहेब पवार ( सेंट फिलोमीना चर्च) देविदास पगारे ( बिल्डिंग पेन्टींग काँन्ट्ँक्टर) आणि सेवानिवृत्त शिक्षक श्री रनाळकर सर उपस्थित होते.


