शिवप्रसाद महाले दक्षिण आफ्रिका विद्यापीठाकडून मानद डॉक्टर पदवी ने सन्मानित
December 22, 2022
0
रामभाऊ आवारे, निफाड
निफाड तालुक्यातील हिंगलाजनगर (खेडे) या गावातील शेतकरी पुत्र तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी कै.मल्हारी राघोजी महाले (गुरुजी) यांचे नातू राज्यपाल पुरस्कृत लाईफ कोच तसेच प्रसिद्ध व्याख्याते मा शिवप्रसाद पंडितराव महाले यांना दक्षिण आफ्रिकाच्या सेंट्रल क्रिस्तियन आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटी च्या वतीने डॉक्टर ऑफ फिलोसोफी इन काउन्सलिंग सायकॉलॉजी डॉक्टरेट पदवी देऊन माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत च्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नुकताच उत्तर गोवा मधील कॅन्डलिंग मध्ये रेडिसन ब्ल्यू या पंचताराकीत रिसॉर्ट मध्ये हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. लाईफ कोचिंग व काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल श्री.महालेंना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी गोव्याची माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार दिगंबर कामत, विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी गिरीशशोम वाकोली, डॉ. राजश्री नागराजन ,एम. नागराज, विद्यापीठाचे कुलगुरू पदाधिकारी आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. समाजाला जिवंत ठेवायचे असेल तर स्वतःच्या नोकरी-व्यवसाया पलीकडे जाऊन समाजासाठी समर्पण भावनेने कार्य करणे आवश्यक आहे. समर्पण, त्याग, सेवा भावने मुळे कामाचा आनंद मिळतो तसेच समाजाची उन्नती देखील साधता येते असे प्रतिपादन गोवा चे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केले .लाईफ कोच शिवप्रसाद महालेंचे विशेष कौतुक करताना इतक्या कमी वयात सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रात करत असलेल्या कार्य पुढील युवा पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे असे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व्यक्त झाले .
देशात सर्वत्र कोरोना विषाणूंमुळे भयानक परिस्थिती उद्भवली होती. महाराष्ट्र मध्ये विशेषता नाशिक, मालेगाव, मुंबई, पुणे , पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण जास्त होते. सर्व ठिकाणी हॉस्पिटल्स रुग्णाने तुडुंब भरलेली होती. त्याचबरोबर रुग्ण प्रचंड घाबरलेली होती. अशा वेळेस बाधित रुग्णांना आजारातून लवकर बरे होण्याकरता वैद्यकीय औषध उपचार सोबतच त्यांचे मनोधैर्य वाढविणे तसेच त्यांना प्रत्यक्ष भेटून मानसिक आधार देणे अत्यंत आवश्यक होते.
अशावेळेस शिवप्रसाद पंडितराव महाले यांनी 2020 मध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर हॉट स्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले होते अशा परिस्थितीत पोलिस कर्मचाऱ्यांची शारीरिक ऊर्जा व मनोधैर्य वाढविण्यासाठी अनेक प्रकारचे सेशन घेऊन आपले योगदान विनाशुल्क दिले आहेत. 2021 मध्ये कोरोना च्या दुसऱ्या लाटेमध्ये बाधित रुग्णांची मनोधैर्य वाढवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने एक नाविन्यपूर्ण उपक्रम रिचार्ज तू डिस्चार्ज राबवला होता.
या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष आय.सी.यु वार्ड मध्ये जाऊन रुग्णांना महाले रोज भेटत असे. शेकडो रुग्णांचे काउंसलिंग, मोटिवेशन, मेडिटेशन सेशन तसेच म्युझिकल एक्सरसाइज च्या माध्यमातून रुग्णांना मानसिक रित्या रिचार्ज करून डिस्चार्ज करण्यामध्ये महत्वपूर्ण कार्य प्रामाणिकपणे आणि जबाबदारी पूर्वक पार पाडलेले आहे. सदर उपक्रमातून त्यांनी रुग्णांमध्ये एक नवीन चैतन्य व ऊर्जा निर्माण केली होती या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे रुग्णांमध्ये कमालीचा सकारात्मक बदल दिसून आला व रुग्णांमध्ये या आजार विरुद्ध लढण्यासाठी अधिकच बळ प्राप्त झाले होते .याविषयी कोविड रुग्णांनी त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल निर्माण झाले अश्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. महालें च्या या कार्याची दखल या अगोदर राज्यस्तरावर महाराष्ट्र चे राज्यपाल, राष्ट्रीय पातळीवर अनेक केंद्रीय मंत्र्यांनी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या ठिकाणी घेण्यात आली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील एक अद्भुत व्यक्तिमत्व समाज समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे त्याबद्दल सर्व स्तरावरून विशेष कौतुक होत आहे.

