डोंगरगांवला शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू
January 02, 2023
0
विंचूर ता.२
डोंगरगाव ता.निफाड येथील व शालेय तरुणीचा शेततळ्यात पडून मृत्यू झाला. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की डोंगरगाव येथील गोकुळ फड यांची इ.१० वीत शिकणारी मुलगी ऋतिका गोकूळ फड (वय १६ वर्षे) ही आज ता.२ सकाळी सहा वाजेच्या दरम्यान शतपावली करण्यासाठी शेततळ्याकडे गेली असता. लवकर घरी परत न आल्याने संशय आला. त्यामुळे चांदोरी येथील सागर गडाख यांच्या शोधकार्य टीमला बोलावण्यात आले. टीमने शेत तळ्यात शोध घेतला असता सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ऋतिकाचा मृतदेह शेत तळ्यात आढळून आला. सदर घटनेची माहिती डोंगरगावचे पोलीस पाटील संजय महादू वाघ यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिली.लासलगांव पोलीस ठाण्याचे स.पो.निरी.राहुल वाघ यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली व पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.अत्यंत शोकाकूल वातावरणात ऋतिका हिच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेची लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याशोध कार्यासाठी चांदोरीचे वैभव जमदाडे ,विलास सूर्यवंशी ,सुरेश शेटे ,कृष्णा धोंडगे आदींनी मदत केली.

