Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

मालेगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी महेंद्र पगार

*मालेगाव:-* नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न मालेगाव शहर व तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली मालेगाव शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. बैठकीत सन 2023 ची नवीन सभासद नोंदणी व विद्यमान तालुकाध्यक्षांनी 3 नोव्हेंबर रोजी राजीनामा दिल्याने विसर्जित झालेल्या कार्यकारिणीची सन 23-24 या दोन वर्षांसाठी नियमानुसार पुन्हा नव्याने निवडणूक घेण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा संघाचे कार्यकारिणी सदस्य विनायक माळी यांनी काम पाहिले. उपस्थित असलेल्या सभासदांनी विचारविनिमय करत निवडणूक बिनविरोध व खेळीमेळीत पार पडली.सर्वानुमते खालील कार्यकारणी निवडण्यात आली. चांदवड येथे झालेल्या जिल्हा पदाधिकारी व तालुकाध्यक्षांच्या संयुक्त बैठकीत नाशिक व मालेगाव येथे महानगर पालिका क्षेत्रात शहराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्या अनुषंगाने मालेगाव नवीन शहराध्यक्षांची निवड करण्यात आली.पिला शहराध्यक्ष होण्याचा मान राहुल पवार यांना मिळाला. _*नवनिर्वाचित पदाधिकारी..*_ १] तालुकाध्यक्ष-महेंद्र पगार-लोकमत. २] शहराध्यक्ष-राहुल पवार-दक्ष पोलीस टाईम्स. ३] कार्याध्यक्ष-राजेश सुर्यवंशी-लोकनामा ४] उपाध्यक्ष:- बलराम चौधरी-दक्ष पो. टाइम्स. ५] उपाध्यक्ष-सुभाष पाटील-लोकमत. ६] सरचिटणीस: राजेश धनवट-लोकनामा. ७] सहचिटणीस:- मुकेश खैरनार. ८] खजिनदार:- दिलीप पाथरे-दै.बाळ कडू ९] सहखजिनदार:- गणेश जंगम-लोकमत. १०] संघटक:- विजय ठोके-सकाळ. ११] सहसंघटक:- समीर माळी-मोसम गिरणा. कार्यकारणी सदस्य म्हणून कैलास माळी-गिरणा मोसम,हरीश मारू-,समाधान शेवाळे-गावकरी,प्रमोद बोरसे-सकाळ. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार व जिल्हा कार्यकारणी सदस्य विनायक माळी यांचे हस्ते करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.