BHAUSAHEB HUJBAND
(8999921994)
साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
हृदयरोग निदान शिबिर यमुना हाॅस्पिटल, विंचूर येथे उत्साहात पार पडले. धन्वंतरी
पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विंचूर
ग्रामपालिकेचे सरपंच सचिन दरेकर, ओ.बी.सी.हक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
कैलास सोनवणे, माजी सरपंच अविनाश दुसाने,अँड संजय दरेकर, कर्मवीर विद्यालयाचे
प्राचार्य नंदकुमार देवढे, विंचूर डॉ. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ राजेश कांगणे हे होते.
दरम्यान यमुना हाॅस्पिटलचे संचालक डॉ.काकासाहेब तासकर यांनी मातोश्री यमुनाबाई
तासकर यांच्या स्मरणार्थ विंचूर करांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेल्या
रुग्णवाहिकेचे लोकार्पण लासलगाव पोलिस ठाण्याचे स.पो.निरी.राहूल वाघ यांच्या हस्ते
करण्यात आले. यावेळी साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट नाशिकचे डॉ. चिन्मय कुलकर्णी
यांनी हृदय विकाराची लक्षणे निदान व उपचार याबाबत माहिती दिली. तर मान्यवरांनी
आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार डि.बी.काद्री, नामदेव
देसाई,विंचूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संदीप शिरसाट, प्रमोद तुपे पो.हवा.योगेश शिंदे,
ग्रामपालिका सदस्य नानासाहेब जेऊघाले, राजेंद्र मोरे, डॉ.सुभाष शेणगे, डॉ.राजेंद्र
गायकवाड, डॉ भागवत गुंजाळ, डॉ रमेश सालगुडे, डॉ. किशोर चौधरी, डॉ स्वप्निल गुंजाळ,
सद्दाम शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ स्मिता तासकर यांनी तर
आभार प्रदर्शन डॉ. काकासाहेब तासकर यांनी केले.

