Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये परिचारिका ‘सेवाव्रतीं’चा सन्मान


 अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये  परिचारिका ‘सेवाव्रतीं’चा सन्मान

भाऊसाहेब हुजबंद 8999921994 यासकडून...

सेवा परमो धर्म : या सुविचारातील अर्थाप्रमाणे सेवा हाच सर्व श्रेष्ठ धर्म आहे. याची प्रचिती सध्या आपणांस येत आहे ती परिचारिकेंच्या सेवेने….. 

जागतिक परिचारिका दिवस निमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे परिचारिका सन्मान सोहळ्यात डॉ. सुशील पारख अध्यक्षीय भाषणात म्हणाले, कोणत्याही रुग्णालयातील रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकेच्या देखरेखीखाली असतो. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची अहोरात्र सेवा परिचारिका या करीत असतात. रुग्णाला सकारात्मकता प्रदान करण्याचे, त्यांना आनंद देण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करीत असतात. करोनासारख्या महाभयंकर संकटकाळात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. कुटुंबांची, मुलांची, प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र झटून परिचारिका आपली सेवा अत्यंत चोखपणे बजावाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य असेच आहे. त्यांच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जाऊ शकत नाही. हे त्यांनी स्वतःच्या कार्यकालातील दाखले देऊन सांगितले.

या “ जागतिक परिचारिका दिवस ” निमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये परिचारकांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सन्मान सोहळ्यात विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित हि  करण्यात आले, या सन्मान सोहळ्यास अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख , केंद्र प्रमुख समीर तुळजापूरकर, नर्सिंग  सुपरिंटेंडेंट मनीषा कोलते ,वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 या विशेष सन्मान सोहळ्यात परिचारिका विषयी कृतज्ञता: व्यक्त करताना समीर तुळजापूरकर म्हणतात,करोना काळात सातत्याने होणारा बदल आत्मसात करून धीरोदत्तपणे या लढ्याला तोंड दिले, याचे कौतुक करावे तितके कमी आहे. यापुढील काळातही सर्व परिचारिका अशाच पद्धतीने कार्यरत राहतील,' असा विश्वास व्यक्त करून परिचारिकांचे  कौतुक  केले.    

   रुग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करून, त्या रुग्णांच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी धडपड असते ती "परिचारिकांची" उपचारांदरम्यान डॉक्टरांच्या सेवेशिवाय रुग्णांना जास्त आपलेपणा जाणवतो तो या परिचारिकांमुळेच. असे प्रतिपादन हृदय शल्य चिकित्सक डॉ धनंजय बन्सल यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त करून सभागृहातील उपस्थितांची विशेष दाद मिळवली. 

-----------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.