विंचूर वि.का.सो.चेअरमनपदी किशोर दरेकर व्हा.चेअरमन पदी प्रविण चव्हाण बिनविरोध
April 30, 2022
0
BHAUSAHEB HUJBAND Mo. 8999921994
विंचूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी किशोर भास्करराव दरेकर यांची तर व्हा. चेअरमन पदी प्रविण बाबासाहेब चव्हाण यांची मधुकर केदूजी दरेकर यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवड झाली. विंचूर वि.का.स. सोसायटीच्या चेअरमन व्हा.चेअरमन पदाच्या निवडीसाठी सोसायटीच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालकांची सभा आयोजित करण्यात आली होती.निर्धारीत वेळेत चेअरमन व्हा.चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने किशोर दरेकर यांची चेअरमन पदी तर प्रविण चव्हाण यांची व्हा.चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.निवड घोषित होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला.तसेच नवनिर्वाचित चेअरमन,व्हा.यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून इगतपुरी येथील सहा.निबंधक अर्चना सौंदाणे, निफाडचे सहकार अधिकारी आर एस ढवळे हे होते. त्यांना संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर सालगुडे यांचे सहकार्य लाभले.याप्रसंगी पॅनेलचे नेते मधुकर के. दरेकर, मुरलीधर निकाळे, आनंदा मवाळ, सोपान दरेकर, मोतीराम दरेकर, अशोक दरेकर,बापूसाहेब सोदक, मुकुंद राऊत,सरला दरेकर, वसंतराव पानगव्हाणे, संजय पाटील, वाळू दरेकर, राजेंद्र भा. दरेकर, दत्तात्रय दरेकर, नानासाहेब जेऊघाले, शेखर लोळगे, दिनकर चव्हाण,छगन सांगळे, युवराज दरेकर, अमोल दरेकर, प्रविण सालगुडे, दिलीप देहर्डे,अनिल सांगळे, कमलेश निकाळे, दिलीप चव्हाण, रत्नाकर दरेकर, बापूसाहेब दरेकर, संदीप दरेकर, कमलाकर दरेकर, रोहित चौधरी, आदेश दरेकर, आदी उपस्थित होते.

