Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

डोंगरगाव विविध कार्यकारी सेवा सह.संस्थेत शैनेश्वर पॅनेलची एकहाती सत्ता

BHAUSAHEB HUJBAND 8999921994 डोंगरगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक होवून ता.२४ रोजी निकाल जाहिर झाला. त्यात अशोक नागरे, रामनाथ नागरे, सकाहरी आव्हाड, रामनाथ किसन सांगळे,भिमा फड,नंदू नागरे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या शैनेश्वर शेतकरी विकास पॅनलचे तेरा उमेदवार विजयी झाले.तर गोरक्षनाथ शेतकरी विकास पॅनलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. शैनेश्वर शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार व कंसात पडलेली मते पुढीलप्रमाणे -रामनाथ नागरे (३९०),अशोक नागरे (३८९),सतिष आव्हाड (३८८),डॉ.भाऊराव सांगळे (३८३ ),कैलास नागरे (३६३),चंद्रभान नागरे (३५५), हरी नागरे (३५९),शिवाजी फड (३४१),मुक्ताबाई नागरे (३५५),उज्ज्वला काकड (३५४),दिलीप राऊत (३७५),अर्जुन पातळे (३६०),दत्तु आव्हाड (३७३) आदी उमेदवार विजयी झाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.