Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

ओ.बी.सी.हक्क परिषद प्रदेशाध्यक्षपदी कैलास सोनवणे

भाऊसाहेब हुजबंद यांजकडून... 8999921994
ओ.बी.सी.हक्क परिषद दिल्लीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी येथील कैलास रामनारायण सोनवणे यांची निवड करण्यात आली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने व त्यांचे लहान बंधू प्रल्हाद मोदी यांच्या आदेशानुसार सोनवणे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.औरंगाबाद येथील हाँटेल जीशान येथे ओ.बी.सी. हक्क परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते सोनवणे यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कल्याणराव पाटील हे तर प्रमुख अतिथी म्हणून औरंगाबाद म.न.पा.चे माजी महापौर भगवान घडामोडे,ओ.बी.सी.हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप फाले,राष्ट्रीय महासचिव विठ्ठल रणबावरे, उपाध्यक्ष गणेश घोरपडे,राष्ट्रीय सचिव रंजना पवार, तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष एन.एस.किरणकुमार मोदी हे होते. केंद्रीय मंत्री डॉ.कराड यांनी केंंद्र सरकार ओ.बी.सींच्या पाठीशी असून आपणही केंद्रीय मंत्री या नात्याने ओ.बी.सी. समाजास सर्वोतोपरी सहकार्य करु असे आश्वासन दिले.तर नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष कैलास सोनवणे यांनी ओ.बी.सी.हक्क परिषद दिल्ली ही ओ.बी.सी.च्या उत्कर्षासाठी स्थापन करण्यात आलेली व राजकीय पक्ष विरहित संघटना आहे. संघटनेचे मुख्य सल्लागार प्रल्हाद मोदी यांच्या माध्यमातून ओ.बी.सी.समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु वेळ प्रसंगी राज्य व राष्ट्रीय पातळीवर लढा उभारुन ओ.बी.सी समाजास न्याय देण्याचा प्रयत्न करु.असेे प्रतिपादन केले. याप्रसंगी रंगनाथ गुरव, रामचंद्र आईलवार,संतोष पलोड,गणेश पवार,अनिल कचरे,अँड वाल्मिकराव गायकवाड, पंकज काळे,अरुण भांबरे,अरुण खांगळ,गंगाधर गोरेे, निरज भट्टड,सोपान दरेकर,निलेश सालकाडे,संपत नागरे,ज्ञानेश्वर शिरसाट,डि.बी.काद्री, किशोर पाटील, जगन्नाथ जोशी,प्रकाश जाजू,भाऊसाहेब हुजबंद, संंदीप शिरसाट,नितीन गायकवाड,दिपक घायाळ, अविनाश सोनवणे,पुरुषोत्तम कल्याणकर,धनंजय गांगुर्डे,योगेश गायकवाड, मयूर गोरे, पंकज सोनवणे आदींसह ओ.बी.सी. समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.