*नाशिक जिल्हा रयत सेवक संघ सहविचार सभा व नवीन कार्यकारिणी निवड संपन्न
October 04, 2021
0
भाऊसाहेब हुजबंद यांजकडून...
8999921994
?
"जागवू कर्मवीर निष्ठा, वाढवू रयत प्रतिष्ठा " या ध्येय्याने प्रेरित होऊन रयत सेवकांच्या अडीअडचणी सोडविण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्हा रयत सेवक संघाची सहविचार सभा नुकतीच माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य वडजे डी.एस.(बापू) यांच्या अध्यक्षतेखाली न्यू इंग्लिश स्कूल आडगाव येथे उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सभेच्या अध्यक्ष निवडीची सूचना एस.एस.फुलमाळी यांनी मांडली व त्यास एन.बी.शिंदे यांनी सर्वांनुमते अनुमोदन दिले. यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन केले. कोरोना संसर्गामुळे निधन झालेल्या रयत सेवकांना याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तदनंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.के.नागमोते यांनी केले. याप्रसंगी रयत सेवक संघाच्या प्रांतिक उपाध्यक्षपदी तसेच टीडीएफ शहर कार्यकारीणीवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. रयत सेवकांच्या अडीअडचणी सोडविण्याच्या दृष्टीने व रयत सेवक संघटना अधिक बळकट करण्यासाठी सभासद वाढविणे याबद्दल उपस्थित रयतसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. डी.आर. गायकवाड यांनी यावेळी विविध अभिनंदनाचे ठराव मांडले. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित प्रकल्प अधिकारी प्राचार्य शेळके सर यांनी आश्रम शाळेचे प्रश्न व सेवकांचा सहभाग यासंबंधी आपले मनोगत व्यक्त केले. माजी मुख्याध्यापक मोकळ बी.बी. सर यांनी संघटनेची ध्येय-धोरणे व कार्यकारिणीची निवड यावेळी आपल्या मनोगतातून मांडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष वडजे बापू यांनी सेवकांचे विविध प्रश्न व रयत सेवक संघाचे महत्त्व आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. यानंतर नाशिक जिल्हा रयत सेवक संघ नूतन कार्यकारणीची पुढीलप्रमाणे निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष- बापू दिवे (जानोरी), उपाध्यक्ष- रावसाहेब म्हस्के(वावी) व के.एम. जगदाळे (आश्रमशाळा), सेक्रेटरी- अमोल पारिक (ठाणगाव), खजिनदार व मीडिया प्रतिनिधी पंकज सरोदे (विंचूर) तसेच तालुकानिहाय सदस्य प्रा.कोरडे सर, भोसले सर, गायकवाड सर, प्रवीण पाटील, सतीश पावरा, एस.टी.पवार, एस.बी.गोसावी, डी.आर.सोळंके, एम.एस.खैरनार, फुलमाळी सर यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारणीचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या सभेस लाईफ वर्कर के.डी.बागले, व्ही.एम.सालगुडे, बी.के.चव्हाणके, सोनवणे सर, शेटे सर, आर.एन.टर्ले, सोळसे सर, आजी-माजी रयतसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी पर्यवेक्षक एन.जे. भोये यांनी उपस्थितांचे आभार मानले. वडजे बापू यांनी रयत सेवक संघाच्या वतीने मुख्याध्यापक एम.बी.हिंडे यांचे इमारत व हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.

