Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

विष्णूनगरला गुड ड्रॉप कंपनीकडून मुलांना मोफत शिक्षण

विष्णूनगरला गुड ड्रॉप कंपनीकडून मुलांना मोफत शिक्षण भाऊसाहेब हुजबंद 8999921994 विंचूर येथील औद्योगिक वसाहतीमधील गुड ड्रॉप वाईन सेलर कंपनीच्या वतीने विष्णूनगर ग्रामपंचायत हॉलमध्ये विष्णूनगर येथील विद्यार्थांना मोफत तासिकेचे उद्घाटन विष्णूनगरच्या सरपंच मंगला घायाळ तसेच कंपनीचे संस्थापक अध्यक्ष अश्विन रॉड्रिग्ज यांच्या हस्ते करण्यात आले.कंपनीच्या वतीने ५० इंची एलईडी सेट तसेच स्वयंसेविका उज्वला घायाळ उपलब्ध करून दिले आहे.           दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे शाळा बंद आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहात असल्याने विशेषता ग्रामीण भागातील मुलांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे.ही उणीव भरून काढण्यासाठी कंपनीकडून विष्णूनगरमधील इयत्ता ५ ते ७ वीच्या विद्यार्थांना ग्रामपंचायत हॉलमध्ये दररोज दोन तास मोफत तासिका घेतली जाणार आहे.याचा सर्व विद्यार्थांनी फायदा घ्यावा तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना मोफत तासिकेसाठी पाठवावे असे आवाहन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष अश्विन रॉड्रिग्ज यांनी केले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक कैलास शिंदे,उपसरपंच नामदेव घायाळ ,वाल्मिक घायाळ ,अक्षदा घायाळ,विलास जेऊघाले,मच्छिंद्र गावडे,रंजना घायाळ ,सरला मुरकुटे,गयाबाई देसले, ग्रामसेवक कैलास जाधव,संजय घायाळ,अमोल घायाळ आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.