*न्यु ब्लाॅसम्स इंग्लिश मिडीयम स्कुल मधे महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी*
October 02, 2021
0
भाऊसाहेब हुजबंद यांजकडून...
8999921994
विंचुर । येथील न्यु ब्लाॅसम्स इंग्लिश मीडियम स्कुल व समर्थ प्राथमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५२ वी जयंती व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची ११७ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दोन्ही महान व्यक्तींच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
विद्यार्थांनी झुम मिटींग च्या माध्यमातुन यात आपला ऑनलाईन सहभाग नोंदवला. सुरवातीला शिक्षकांनी या दोन्ही महान व्यक्तींच्या जिवनातील काही प्रसंग सांगुन विद्याथ्यांमध्ये प्रेरणा निर्माण केली, त्यानंतर काही विद्यार्थांनी चित्र काढुन दाखवले तर काही विद्यार्थांनी भाषणातुन आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी न्यु ब्लाॅसम्स इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मुख्याध्यापिका ज्योती माठा, समन्वयक माधवी सहाय, मोनाली कामडी, पुजा सोनी, जयश्री नेवगे, दिपाली भावसार, अर्चना कुलकर्णी, संगिता जगताप, रेखा गांगुर्डे, सोनाली ढेपले, गौरव भोईटे, भुषण सावंत आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

