विंचूर येथील सन्मित्र निलेश चव्हाण उद्यानचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा
October 26, 2021
0
भाऊसाहेब हुजबंद यांजकडून...
8999921994
विंचूर येथील हिरवाईने नटलेल्या झाडांनी सजलेल्या सन्मित्र निलेश चव्हाण उद्यानाचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येने वृक्ष लागवड करून, त्याला खतपाणी घालून त्याचे संगोपन करून पाच वर्षानंतर ती झाडे डेरेदार झाल्यानंतर त्यांचा वर्धापन दिन जोरदारपणे साजरा करण्याचे उदाहरण क्वचितच पाहायला मिळते, आणि तेच विंचूर येथील सन्मित्र नगर मधील रहिवासी व ग्रामस्थांनी करून दाखवले आहे. नाशिक औरंगाबाद महामार्गावर विंचूर मधील सन्मित्र नगर मध्ये सन्मित्र निलेश चव्हाण उद्यानाची निर्मिती ही वीस गुंठे जागेत निलेश चव्हाण मित्र मंडळ, हितचिंतक व ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून करण्यात आली आहे शिवाजी घायाळ, दिलीप कोथमिरे,अविनाश दुसाने,अँड संजय दरेकर, किशोर पाटील, एकनाथ बडाख, संतोष उशीर, डॉ मंगेश रायते, दिपक आहेर, केदू साळवे,योगेश खुळे, सुनील मोरे, रमेश ढवण, संजय झाल्टे, योगेश साळी चांगदेव डोंगरे व अपर्णा प्राईड मंगल कार्यालयाचे कर्मचारी मेहनत घेत आहेत.
येथील सन्मित्र नगरातील रहिवासी व निलेश चव्हाण मित्र मंडळाने पडित जागेवर विकसित केलेल्या सन्मित्र निलेश चव्हाण उद्यानाचा वाढदिवस साजरा करुन निसर्ग देवतेची पुजा केली. निफाड पं.स. सदस्य संजय शेवाळे, विंचूर ग्रामपालिकेचे सरपंच सचिन दरेकर, माजी सरपंच गंगाधर गोरे,राजाराम दरेकर,भास्कर परदेशी, निफाड पं.स.चे माजी सभापती विलास गोरे, इफको नवी दिल्लीच्या संचालिका साधना जाधव, शिवसेना उप तालुका प्रमुख फिरोज मोमीन यांनी या अभिनव उपक्रमास भेट देऊन कौतुक केले.
मनुष्याला शरीरस्वास्थ्यासाठी शारीरिक व्यायामाची गरज असते तशी मानसिक स्वास्थ्यासाठी झाडे, फुले, हिरवळ,,शांतता अशा आल्हाददायक वातावरणाचीही आवश्यकता असते. आमच्या मित्राच्या स्मरणार्थ बनविलेल्या या उद्यानात या सर्व बाबी ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
अविनाश दुसाने.. माजी सरपंच ग्रामपालिका विंचूर
