Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

प्रतापसागर बंधारा फुटल्याने विंचूर येथील अनेकांचे संसार उद्ध्वस्त

भाऊसाहेब हुजबंद यांजकडून... 8999921994
विंचूर परिसरात मुसळधार पावसामुळे दि. 28 सपटेंबर रोजी रात्रीच्या सुमारास विंचूर ग्रामपालिकेचा जुना पाणी पुरवठा बंधारा फुटल्याने बंधाऱ्या लगतच्या पंधरा कुटुंबाचा संसार वाहून गेला.मात्र मजुरांच्या समय सुचकते मुळे जिवीत हानी टळली.काल दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विंचूर व लासलगाव परिसरातील नद्या नाले दुथडी भरुन वाहत होते. नद्या नाल्यांच्या पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता. की या प्रवाहाने लासलगाव येथील प्रताप सागर हा बंधारा फुटला.तर प्रताप सागरच्या पाण्याचा लोंढा मोठ्या प्रमाणावर विंचूरच्या बंधाऱ्यात आल्याने विंचूरचा जुना पाणी पुरवठा बंधाराही फुटला. बंधाऱ्या लगत पंधरा ते सोळा कुटुंबांची वस्ती आहे. या वस्ती वरील मजूर झोपलेले असतांना रात्री दहा वाजेच्या सुमारास फुटलेल्या बंधाऱ्याचे पाणी अचानक मजूरांच्या वस्ती मध्ये घुसल्याने मजूर जागे झाले.व आपला जीव घेऊन पळाल्याने मजुरांचा जीव वाचला. मात्र झोपड्यांमध्ये असलेले अन्नधान्य, भांडे, गँस, दुरदर्शन संच, भ्रमणध्वनी, कपडे, आदी संसार उपयोगी साहित्यांंसह झोपड्या वाहून गेल्याने मजूरांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तसेच सोमेश्वर दरेकर या शेतकऱ्यांचे वीस फूट रुंद व तीस फुट लांबीचे पत्र्याचे शेडही या पुराच्या पाण्यात वाहून गेले.या शेडमध्ये देखील सोमेश्वर दरेकर यांच्या कडे कामास आलेले मजूर झोपलेले होते.मात्र सोमेश्वर दरेकर यांना पुराच्या पाण्याचा अंदाज आल्याने त्यांनी वेळीच मजूरांना सुरक्षित स्थळी हलविल्याने पुढील अनर्थ टळला.तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी घुसल्याने शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा,कांदा, मका, सोयाबीन आदी शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.