विंचूर लासलगाव रोडवर भीषण अपघातात पाच ठार
September 25, 2021
0
भाऊसाहेब हुजबंद
8999921994
विंचूर,ता.२५ विंचूर लासलगाव रस्त्यावर मंजुळा पॅलेसजवळ ता.२५ रोजी सायंकाळी साडे सहावाजेचेच्या दरम्यान रिक्षा व हायवा ट्रक यांच्यात भिषण अपघात होवून रिक्षामधील रिक्षा चालक व चार प्रवासी असे पाच जण ठार झाले.यापैकी चार जागीच ठार तर एक अत्यवस्थ होता.त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शनिवार ता.२५ रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान लासलगाकडून प्रवाशांची भरलेली रिक्षा क्र.एम एच १५ वाय ४४६१ विंचूरच्या दिशेने मंजूळा पॅलेसजवळ येत असतांना.विंचूरकडून लासलगावच्या दिशेने जात असलेला हायवा ट्रक क्र.एम. एच.०६ झेड ७५७६ यांच्यात भिषण अपघात होवून रिक्षा चालक सुहास मनोहर निकाळे (वय ४०) रा.विंचूर तसेच प्रवाशी विठ्ठल बाजिराव भापकर वय ६५ रा.लोणी ब्रु ,ता.रहाता, बाळासाहेब बालाजी नांगरे वय ६० रा. प्रवरा कॉलणी ,लोणी ब्रु., रतन सुकदेव गांगुर्डे वय ४० रा. विंचूर, किसन गोविंददास बैरागी व ६० रा. धारणगाव खडक आदी प्रवाशी जागीच ठार झाले.मृतांना लासलगाव ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनास्थळी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहा.पो.निरी.राहूल वाघ ,पो.उपनिरी.रामकृष्ण सोनवणे,पो.हवा.राजेंद्र घुगे,योगेश शिंदे,कैलास मानकर दाखल होवून हायवा ट्रक चालकास पोलीसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास लासलगाव पोलीस तपास करत आहे.

