विंचूर विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी जयंती साजरी
September 22, 2021
0
BHAUSAHEB HUJBAND
8999921994
विंचूर विद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी जयंती कोवीड नियमांचे पालन करीत उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन विंचूर ग्रामपंचायत सरपंच सचिन दरेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यालयातील गीतमंचाने रयतगीत, रयतमाऊली गीत सादर केले. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, स्थानिक सल्लागार समिती सदस्य पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, माजी उपसरपंच भास्कर परदेशी, ग्रामपंचायत सदस्य संतोष जाधव, दिलीप चव्हाण, सुभाषनगर उपसरपंच बापूसाहेब सोदक, पत्रकार किशोर पाटील, पालक-शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विनायक जेऊघाले, शंकर दरेकर, आबा दरेकर, स्नेहल साळी, मंदाकिनी आहेर, आरती जाधव, सचिन जेऊघाले व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य एन.ई. देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे लाईफ वर्कर राजेंद्र चांदे यांनी केले.

