ना.भुजबळांचे विंचूरला गावकऱ्यांच्या वतीने स्वागत
September 12, 2021
0
ना.भुजबळांचे विंचूरला गावकऱ्यांच्या वतीने स्वागत
विंचूर BHAUSAHEB HUJBAND
ना.भुजबळांचे विंचूर ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले.ना.छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली. निर्दोष मुक्तते नंतर ना.भुजबळ हे प्रथमच मतदार संघाच्या दौऱ्यावर आले असता विंचूर ग्रामपालिका, विंचूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस,विंचूर शहर शिवसेना, विंचूर प्रेस क्लब,नवदुर्गा मित्र मंडळ, कोष्टी समाज,बुरुड समाज, मुस्लिम समाज,नाभिक समाज,
हनुमान नगर ग्रामपंचायत,विष्णूूनगर ग्रामपंचायत, सुभाष नगर ग्रामपंचायत आदींंच्या वतीने येेथील तीन पाटीवर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है।अशा घोषणा दिल्या.उपस्थितांशी संवाद साधताना ना. भुजबळ यांनी मला व कुटुंबीयांना खोट्या केस मध्ये गोवण्यात आले होते.तरी देखील जनतेने आपणास स्विकारले.गेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयाने जनतेच्या न्यायालयात निर्दोषत्व सिद्ध झाले होते.आणि आता न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे न्याय व्यवस्थेवर असलेला आपला विश्वास अधिक दृढ झाला.सत्य परेशान हो सकता है।लेकीन पराजित नहीं। जनता जनार्दनाच्या आशिर्वादाने आपली निर्दोष मुक्तता झाली.असे प्रतिपादन करत जनतेचे आभार मानले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पांडुरंग राऊत,निफाड पं.स.चे माजी सभापती विलास गोरे,विंंचूर ग्रामपालिकेच्या प्रभारी सरपंच शिरीन मोमीन,सरपंच सचिन दरेकर,माजी सरपंच नानासाहेब जेऊघाले,आत्माराम दरेकर, विष्णू नगरचे संजय घायाळ, माजी सरपंच किशोर मवाळ,भरत कानडे, रणजित गुंजाळ, माजी जि.प.सदस्य भाऊसाहेब भवर, मुंबई कृ.उ.बा. समितीचे संचालक जयदत्त होळकर,बबन शिंदे, ब्राह्मणगाव विंचूरचे सरपंच मंगेश गवळी,इस्माईल मोमीन,जयंत साळी, महेंद्र पुंड, सोहेल मोमीन, शंकरलाल सोनी, अनिल विंचूरकर, अनिल सांगळे, मोसीन शेख, सचिन सरोदे, अमजद पठाण, संजय शिरसाट,किशोर जेऊघाले, फिरोज मोमीन, ललित दरेकर,अँड विनोद गुंजाळ, अनिल दरेकर, गुलजार बेग, दिलीप सोनवणे,निलेश दरेकर, आनंदा नागमोते,सुनील नेवगे, मुकुंद राऊत, ओम राऊत,दिनेश राऊत,दिलीप साळुंके,शेखर महाजन, जीवन दिवटे, दत्तात्रय सुर्यवंशी, रमेश ढवण विनायक महाले,राजेंद्र विभूते, नितिन दारके,प्रशांत गोरे,गोकुळ शिरसाट संजय रोटे,शंकर पवार,शाम शिंदे,अनिल वाजे, भरत साळुंके,चंद्रकांत सुर्यवंशी,किशोर गोरे, सुलतान शेख मोसीन शेख, सचिन सरोदे,अर्शद शेख, शादीक मोमीन, तबरेज़ सैय्यद,पारस राऊत,सागर राऊत सद्दाम शेख,सुरज राऊत, प्रथमेश राऊत,फरीदा काझी आदींसह ४२ गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप कोथमिरे यांनी तर आभार प्रदर्शन सुदेश दरेकर यांनी केले.

