Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

”स्मार्ट सुनबाई” २१ नोव्हेंबर २०२५ ला संपूर्ण महाराष्ट्रावर करणार राज्य!”

“रहस्य, हास्य आणि भावबंधांचा मेळ साधणारा शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित नवीन मराठी चित्रपट ”स्मार्ट सुनबाई” २१ नोव्हेंबर २०२५ ला संपूर्ण महाराष्ट्रावर करणार राज्य!”

नाविन्यपूर्ण संकल्पना आणि उत्सुकतेने सजलेला एक धमाल मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित, कार्तिक दोलताडे पाटील सह निर्मित हास्य, थरार आणि गूढतेने भरलेला एक नवाकोरा सिनेमा “स्मार्ट सुनबाई” २१ नोव्हेंबर २०२५ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या नुकताच रिलीझ झालेल्या ट्रेलर ने प्रेक्षकांच्या मनात औत्सुक्याची ठिणगी पेटवली आहे. एक स्पष्ट होतं की या कथेत काहीतरी विलक्षण आणि गूढ दडलेले आहे ज्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सिनेमात असलेल्या गाव-शहराची भन्नाट जुगलबंदी, खुमासदार विनोद आणि एका गूढ रहस्याचा ताण यांचा सुंदर मिलाफ यामुळे प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. “ही स्मार्ट सुनबाई नक्की कोण? आणि तिच्या आयुष्यात असं काय घडणार आहे?”

संतोष जुवेकर, रोहन पाटील, भाऊ कदम, किशोरी शहाणे, सायली देवधर, मोहन जोशी, दीपक शिर्के, प्राजक्ता हनमघर, प्राजक्ता गायकवाड, उषा नाईक, अंशुमन विचारे, स्नेहल शिदम, विनम्र बाबल, भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे, मोनिका बंगाळ, आर्या सकुंडे, वैशाली चौधरी, सपना पवार, कांचन चौधरी हे लोकप्रिय कलाकार या सिनेमात झळकणार असून, त्यांची केमिस्ट्रीच या चित्रपटाची खरी जमेची बाजू ठरणार आहे.

चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी केले असून, विजय नारायण गवंडे,साई - पियुष यांनी या सिनेमाला बहारदार संगीताची साथ दिली आहे. गीतकार वैभव देशमुख, अदिती द्रविड असून अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र, उर्मिला धनगर यांचे सुरेल स्वर या सिनेमाला लाभले आहेत.

प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेची लाट निर्माण करणारा हा नवीन सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित चित्रपट ”स्मार्ट सुनबाई” २१ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.