विंचूर....
मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मोफत आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव वाकडा येथे सुरू असून यामध्ये निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविका अशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करून मधुमेह रक्तदाब व कॅन्सर या सारख्या गंभीर रोगांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच आवश्यक असल्यास विविध तपासण्या करून रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून औषध उपचार केला जात आहे. विंचूर बीट अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती वंदना खांदवे यांनी सर्व अंगणवाडी सेविकांना आवाहन केले की आपण या अभियानाचा लाभ घेऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी. यावेळी बोलताना डॉ अविनाश पाटील वैद्यकीय अधिकारी निमगाव वाकडा यांनी सांगितले की महिला रुग्णांमध्ये बी.पी. डायबिटीस, लिव्हर, किडनी असे रुग्ण आढळून आले असून त्यांना योग्य मार्गदर्शन करून औषध उपचार केले जात असून त्यांना योग्य ती काळजी घेण्याचे सांगितले जात आहे. तसेच आतापर्यंत 42 अंगणवाडी सेविका, 42 आशा वर्कर, 70 इतर कर्मचारी व पाचोरा येथील जिल्हा परिषद शाळेत हे आरोग्य तपासणी शिबिर घेतले गेले असून डॉ अविनाश पाटील डॉ वरूण राज ठाकरे, डॉ सचिन पवार प्राथमिक आरोग्य केंद्र, निमगाव वाकडा येथील वैद्यकीय अधिकारी यांच्यासह एस एस चव्हाण, आरोग्य सेवक, पी.के पुंड, के एच नंदेश्वर, रवी खुर्द, आरोग्य सेविका श्रीमती मोरे यांच्यासह सर्व कर्मचारी हे डॉ सुधाकर मोरे जिल्हा वैद्यकीय अधिकारी व डॉ सुजित कोशिरे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वीपणे राबवित असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाचा रुग्णांना फायदा होऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन उपचार केले जात आहे असे डॉ अविनाश पाटील यांनी सांगितले.

.jpeg)