विंचूर- आधिक मासाचे औचित्य साधून येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने आयोजित बहन-बेटी मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. समाजातील विवाहीत बहिणी व मुलींना जावयासह धोंड्याचा वाण देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी समाजाच्या वतीने स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास समाजाचे ज्येष्ठ सदस्य डाँ बन्सीलाल मालपाणी, अनिल मालपाणी, सुनील मालपाणी, अशोक भट्टड, प्रकाश भट्टड, समाजाचे अध्यक्ष गोपाल भट्ट़, श्रीकांत मालपाणी, सूरज भट्टड, सुभाष जाजू, पवन जाजू, परेश बाहेती, महिला मंडळ अध्यक्षा सौ.माधूरी भट्टड, सौ.पुष्पा भट्टड, सौ.अर्चना मालपाणी, सौ.शितल भट्टड, सौ.जयश्री जाजू, सौ.भाग्यश्री जाजू, सौ.पूनम जाजू, कु.राखी जाजू, कु.रिया भट्टड यांसह समाजातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

