Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

सोळा गाव पाणी योजनेच्या नवीन पाईपलाईन मधून पाणीपुरवठा सुरू

*महाराष्ट्र राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब* यांच्या सूचनेनुसार,नांदूर मध्यमेश्वर धरणातून सोळागाव पाणी पुरवठा योजनेसाठी प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, सरपंच जयदत्त होळकर यांच्या हस्ते बटण दाबून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.

यावेळी पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता निकम, शाखा अभियंता पाटील, छगन भुजबळ यांचे विशेष कार्य अधिकारी उदयसिंग राजपूत, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, अशोक गालफाडे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब बोचरे, सरपंच बाळासाहेब पुंड, गुणवंत होळकर, डॉ.विकास चांदर, पांडुरंग राऊत, संतोष राजवाडे, विलास गोरे, मोसीन शेख, दत्तात्रय व्यवहारे, ग्राम विकास अधिकारी पाटील, कंत्राटदार अनिल काळे, भालचंद्र भुजबळ, प्रफुल कुलकर्णी, अनिल विंचूरकर,पवन सानप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.