Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

दोन दिवसांत नवीन पाईपलाईन द्वारे पाणी येणार

 *मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून सोळागाव पाणी पुरवठा योजनेच्या नूतन पाईपलाईनचे काम पूर्ण*

*सोळागाव पाणी पुरवठा योजनेच्या नूतन पाईपलाईनची चाचणी पूर्ण*

*सोळागाव पाणी पुरवठा योजनेसाठी नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाणी पुरवठा सुरू; दोन दिवसांत सर्व गावात पाणी पुरवठा होणार सुरळीत*

*लासलगाव,विंचूर,दि.११ ऑगस्ट:-* राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणी पुरवठा योजनेच्या नूतन साडे सहा किलोमीटर पाईप लाईनचे काम पूर्ण झाले असून नांदूर मध्यमेश्वर धरणातून आज पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. हे पाणी मध्यरात्री पर्यंत विंचूर फिल्टर प्लांट मध्ये पाणी पोहचणार आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून सोळागाव पाणी पुरवठा योजनेचे रेट्रोफिटींग योजनेअंतर्गत नूतनीकरण करण्यात येत आहे. या कामांतर्गत साडेसहा किलोमिटर नवीन पाईप लाईन टाकण्यात आली आहे. हे काम पूर्ण होऊन पाईपलाईनची चाचणी पूर्ण झाली असून नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. यावेळी नांदूर मध्यमेश्वर येथे दिलीप खैरे, सरपंच जयदत्त होळकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत बटण दाबून पाणी सुरू करण्यात आला. तसेच पाणी पूजन करण्यात आले. 

यावेळी पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता निकम, शाखा अभियंता पाटील, छगन भुजबळ यांचे विशेष कार्य अधिकारी उदयसिंग राजपूत, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, अशोक गालफाडे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब भवर, सरपंच बाळासाहेब पुंड,सचिन दरेकर, गुणवंत होळकर, डॉ.विकास चांदर, पांडुरंग राऊत, संतोष राजवाडे, विलास गोरे, मोसीन शेख, दत्तात्रय व्यवहारे, सागर बोरडे, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, अजय माठा, नितीन गायकवाड, योगेश खैरनार, साईनाथ शिंदे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, कंत्राटदार अनिल काळे, भालचंद्र भुजबळ, प्रफुल कुलकर्णी, विलास खैरनार, अनिल विंचूरकर, पवन सानप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

*विक्रमी वेळेत पाईप लाईनचे काम पूर्ण*

लासलगाव विंचूरसह पाणी पुरवठा योजनेमध्ये साडेसहा किलोमीटर नूतन पाईप लाईन टाकण्यात आली आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे यांनी अधिकारी व सोळागाव पाणी पुरवठा समितीच्या सदस्यांसमवेत बैठक घेऊन पाईप लाईनचे काम पंधरा दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर कामाला अधिक गती प्राप्त झाली. गेले पंधरा दिवस दिलीप खैरे यांच्यासह छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक व पदाधिकाऱ्यांची संपूर्ण टीम ही या कामाच्या ठिकाणी ठाण मांडून होती. त्यामुळे हे काम विक्रमी वेळेत पूर्ण होऊ शकले आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार योजनेच्या नूतन पाईप लाईनचे काम पूर्ण करण्यात येऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत होईल.

*दिलीप खैरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.