Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

विंचूर भा.ज.पा.चा अनोखा फ्रेंडशिप डे

 

विंचूर- 

स्वतः च्या सुखदुःखाची पर्वा न करता अहोरात्र जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडणारे पोलीस व लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांचा फ्रेंडशिप डे निमित्त विंचूर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार करुन अनोख्या पद्धतीने फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला.

विंचूर कॉम्प्लेक्समध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निफाड पं.स.चे माजी सभापती कैलास सोनवणे होते तर प्रमुख अतिथी म्हणून निफाड पं.स.चे माजी सदस्य संजय शेवाळे, गंगाधर गोरे, भारत कानडे हे होते. 

फ्रेंडशिप डे निमित्त पो.कॉ.संदीप निचळ, कैलास बिडगर, पत्रकार किशोर पाटील, संदीप शिरसाट, भाऊसाहेब हुजबंद, नितीन गायकवाड, दिपक घायाळ, मछिंद्र साळुंके  आदींचा  सत्कार करण्यात आला. 

यावेळी सत्कारास उत्तर देताना पो.हवा.संदीप निचळ यांनी गावातील शांतता, सलोखा कायम राखून  जनतेला सहकार्य करु असे प्रतिपादन केले तर पत्रकार किशोर पाटील यांनी आयोजकांचे कौतुक करून सर्वांना फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा दिल्या. 

यावेळी भा.ज.पा.युवा मोर्चाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष निलेश सालकाडे, तालुका उपाध्यक्ष सुनिल नेवगे, विंचूर शहर अध्यक्ष धनंजय गांगुर्डे, स्मिता कुलकर्णी, मनिषा हारळे, स्वाती जोशी, गोरख सोनवणे, बापूसाहेब दरेकर, ज्ञानेश्वर शिरसाट, मनोज धनवटे, गोरख गांगुर्डे, पुरुषोत्तम कल्याणकर, संदीप कांबळे, निलेश जगताप, पियुष बंब, भाऊसाहेब सोनवणे, नवनाथ दरेकर, निलेश जेऊघाले, गणेश निकम,ओम शेवाळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धनंजय गांगुर्डे यांनी केले तर निलेश सालकाडे यांनी आभार प्रदर्शन केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.