माळी समाज सेवा समितीच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ रविवार दि.(६) रोजी कालिदास कला मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार वसंत गिते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी,प्रा.टी.पी.निकम ,माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत,ऑल इंडिया सैनी समाज संस्थेच्या सचिव सुजाता इळवे,मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद,माजी नगरसेवक बाळासाहेब जानमाळी,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप जुन्नरे,मोना एज्युकेशन संस्थेचे डॉ.दौलतराव गांगुर्डे,अल्ट्राman डॉ.सुभाष पवार ,उद्योजक चंद्रकांत बागुल,उत्कर्ष ग्रुपचे प्रवीण गायकवाड,के.आर.एच हॉस्पिटलचे संचालक डॉ.श्याम पगार,उद्योजक राका माळी,आय.डी.टीचे संचालक महेंद्र शेवाळे,राजकुमार सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
गीते यांनी पुढे बोलतांना शिक्षण आणि महापुरुषांचे आचरणात आणल्यास मनुवादी प्रवृत्ती नष्ट अन्यथा आपले नुकसान होत राहील असे मत व्यक्तमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी बोलतांना विद्यार्थी हा समाजाचा कणा आहे.उच्च शिक्षण घेतल्याशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा असे मत व्यक्त केले.याशिवाय प्रा.टी.पी.निकम,सुजाता इळ्वे,डॉ.सुभाष पवार ,डॉ.दौलतराव गांगुर्डे यांनी आपले मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष राऊत यांनी केले तर सुत्रसंचलन मोहन माळी,अभिषेख निकम यांनी तर आभार मयूर मोटकरी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष प्रभाकर क्षिरसागर , सरचिटणीस हरीश्चंद्र विधाते ,उपाध्यक्ष महेश गायकवाड, युवक समितीचे अध्यक्ष मयूर मोटकरी, महिला सामीतिच्या अध्यक्ष मंगला माळी, प्रसिद्धीप्रमुख सचिन दप्तरे, ,शंतनू शिंदे प्रमोद आहेर, किशोर भास्कर ,राजेंद्र ताजने , प्रवीण जेजुरकर सिताराम सोमासे, दत्ता ढोले ,संजय पुंड,नंदकुमार येवलेकर ,बाळासाहेब वाघ, भास्कर जेजुरकर यांनी मेहनत घेतली.
यावेळी एम.पी.एस.सी,डॉक्टर,इंजिनियर ,वकिल,सर्व क्षेत्रांतील पदवीधर,खेळाडू,१०,१२ ,१ ते ९ या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.



