समाजात सर्व थरातुन विवाह जमविण्यास प्रयत्न करावे- आण्णासाहेब महाराज आहेर
नाशिक - आज सगळीकडे देशात बेरोजगारी,आर्थिक मंदी, नात्यातील एकमेकांचा स्नेह अभाव, कमीपणा न घेणे व सगळं अनुकल पाहिजे,हट्ट- स्वार्थीवृत्ती,मुला मुलींचे शिक्षणाचा असमतोल,नसबंदी मुळे व वंशाला दिवाच हवा या अट्टाहासा पायी समाजाचं काही देणंघेणं नाही अशा अहंकारा पोटी अनेक मुलांचे रखडलेले विवाह ही प्रत्येक समाजात विस्कळीत झालेली फार मोठी समस्या आहे या करिता आपण दोन पाऊल मागं येऊन समाज वृध्दी साठी कमी अधिक पणा न पाहता तातडीनं समाजात सर्व थरातून विवाह जुळविण्याची गरज आहे व तसे प्रयत्न प्रत्येक व्यक्तीन करावे असे विचार वारकरी महामंडळ नाशिक अध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे स्नेह बंधन बहुउद्देशीय संस्था नाशिक,मराठा वधू-वर सूचक मंडळ आयोजित मेळाव्यात व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक श्री प्रभाकर दिंडे व श्री अविनाश वाळुंजे,यांनी व्यक्त केले, व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून धुळ्याचे श्री शिवाजी राव मराठे,शामभाऊ जाधव, डॉ.सचिनकुमार पाटील,डॉ.विनायक शेणगे,मा.आमदार श्री नितिन भोसले, स्नेहबंधन बहु उद्देशिय संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश काका भोसले,येवला पंचमंडळाचे अध्यक्ष श्री मधुकर सांबरे, सचिव श्री संजय पवार, मार्गदर्शक श्री देविदास नाना जाधव, श्री संजय जाधव,श्री तुकाराम वाघ,श्री दत्तात्रय जाधव,श्री जालिंदर मेंढकर,श्री.सुरेश माळोदे,श्री.मदन सिरसाठ आदी उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजन तसेच अतिथी सत्कार विवाह मंडळात उत्कृष्ट कार्य सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांच शाल श्रीफळ देऊन आभार व्यक्त करण्यात आले. प्रथम प्रास्ताविक करतांना प्रमुख मान्यवरांचा परिचय श्री प्रभाकर दिंडे यांनी करुन दिला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष श्री रमेश भोसले,श्री दत्तात्रय जाधव,श्री मधुकर बोजगे,श्री मदन सिरसाठ,श्री आर आर पाटील,श्री.दिपकराव थोरात,श्री.जयवंतराव उघडे,श्री नवनाथ झणकर,श्री रंगनाथ सिरसाठ,सौ. संजिवनी वाघ,श्री विलास जाधव,श्री सुरेश माळोदे,श्री अरुण शेळके, यांनी अनमोल सहकार्य केले.

