मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनंतर लासलगाव ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात
लासलगाव :-
राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार लासलगाव ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे.लासलगाव ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून लवकर या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांच्या सुविधेसाठी तातडीने खड्डे भरण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या होत्या. त्यानुसार आज या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे यांनी अधिकाऱ्यांसमवेत रस्त्याची पाहणी केली होती. त्यानंतर आज तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

