Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

माजी आयपीएस डॉ.प्रतापराव दिघावकर यांचा भाजप मध्ये पक्षप्रवेश*


 भगवान पवार, सटाणा...

मुंबई : सेवा निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक व राज्य लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य डॉ प्रतापराव दिघावकर यांनी आज मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालयात भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, बागलाण चे आमदार दिलीप बोरसे, माजी नगराध्यक्ष सुनील मोरे याच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या असंख्य कार्यकर्ते यांच्यासह भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्या प्रवेश सोहळ्यामुळे धुळे लोकसभा मतदार संघात व प्रामुख्याने मोसम खोऱ्यात भाजपाची मोठी ताकद वाढण्यास मदत होणार असुन आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन हा प्रवेश सोहळा संपन्न झाला आहे हे विशेष 

       डाँ प्रतापराव दिघावकर यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरून सेवा निवृत्त झाल्या नंतर खाकी वरून खादी च्या प्रेमात पडले होते त्याच वेळी प्रतापराव दिघावकर हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या आखाडय़ात उतरतील अशी अटकळ बांधली जात होती. आणी सेवेच्या अखेरीस त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील अनेक शेतकरी वर्गाचे व्यापारी वर्गाकडे अडकलेले पैसे काढून देवून शेतकर्यांना धिर देण्याचे काम केले त्याच प्रमाणे प्रतापराव दिघावकर यांनी बळीराजा आत्मसन्मान सेवा संस्थेच्या माध्यमातून बळीराजांचे प्रश्नाना वाचा फोडण्याचे काम चालू केले होते. 

      डाँ प्रतापराव दिघावकर हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरतील पन कोणत्या राजकीय पक्षाकडून याचे उत्तर मात्र सर्व सामान्य नागरीकांना माहित नव्हते. अखेर त्यांनी आज भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केल्याने सर्व चर्चांना पुर्णविलाम मिळाला आहे. या वेळी मोसम खोऱ्यातील भाऊसाहेब आहिरे यांच्या सह अनेक आजी माजी सरपंच, माजी पंचायत समितीचे पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती चे आजी माजी पदाधिकारी, सोसायटी चे आजी माजी संचालक, सामाजिक कार्यकर्ते यांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला आहे

      या प्रसंगी डॉ प्रतापराव दिघावकर, भाऊसाहेब आहिरे, चंदशेखर बावनकुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.