Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

अधिक मास पोथी महिलांचा स्तुत्य उपक्रम - विजय बुरकुल

सातपूर...

देवाजवळ  मंदिरात जायला पुण्य लागतं, देवाजवळ टिकायला सेवा लागते, देवकृपा व्हायला नम्रता लागते,देव ओळखायला दृष्टी लागते,देव कळायला ज्ञान लागते,आणि ते ज्ञान ग्रंथ ऐकुन मिळते म्हणून अधिकमासाचे औचित्य साधून तुळजाभवानीमाता मंदिर जाधव संकुल सातपूर येथे  सुरु केलेला अधिक मास पोथी श्रवणाचा जाधव संकुल महिला मंडळाचा उपक्रम स्तुत्य आहे असे विचार वास्तू विशारद व शिवसेना ठाकरेगट नाशिक शहर उप महानगर संघटक हभपश्री विजयशेठ बुरकुल यांनी मंदिरात कथेसाठी सदिच्छा भेट देताना व्यक्त केले,

श्रीहभप बुरकुल पुढे म्हणाले अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने अधिक महिण्यात केलेली धार्मिक साधनेचे अधिक फल मिळते, धार्मिक कृत्य करणाऱ्या व्यक्तीचे कायिक,वाचिक,मानसिक पाप क्षालन होऊन मलदोष घालवतो म्हणून  या महिण्यास मलमास असंही म्हणतात, लेक जावई, नविन व्याही व्याहीन यांना वस्र व सुग्रास भोजन देऊन अनेक जन महिनाभर उपवास करतात म्हणून महिलांचा कार्यक्रम खरोखर धार्मिक संस्कार टिकवणारा आहे,या महिन्यात केलेल्या दानाचेही विशेष फल आहे.असे यावेळी वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी ही शुभेच्छा देताना म्हटले आहे.                        

 याप्रसंगी श्री रामदास बनकर,महिंद्राचे श्री शिवाजी वाजे भोसरी पुणे आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमास सौ.अनिता बनकर,श्रीमतीठोंबरे, सौ.छाया बुरकुल ,सौ.माळोदेताई, सौ.राऊतताई, श्रीमती घाटोळ सौ.पाटीलताई,सौ.ठाकरेताई, सौ.सलगरेताई,पुजारी सौ. कुटेताई सौ.अनिता वाघ,सौ.आगलावेताई,सौ.रावतेताई,आदी व असंख्य महिला पुरुष उपस्थीत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.