Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

शिक्षण विभागातील समस्या व त्रुटींवर उपाययोजना करा:

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना शिवसेनेचे तालुका संघटक तथा कुऱ्हेगावचे माजी उपसरपंच जयराम गव्हाणे यांनी दिले निवेदन 

इगतपुरी ( प्रतिनिधी )

ग्रामीण भागातील विध्यार्थ्याना अकरावी नंतर पुढील शिक्षण घेण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आर्थिक अडचणीमुळे गोरगरीब पालकांची मोठी परवड होत आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी माफक दरात प्रवेश फिसह सर्व अटी शिथिल कराव्यात अशा मागणीचे निवेदन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना शिवसेनेचे तालुका संघटक तथा कुऱ्हेगावचे माजी उपसरपंच जयराम गव्हाणे यांनी नुकतेच दिले. मुंबई येथील विधानभवनामध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट उपसरपंच गव्हाणे यांनी घेऊन प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांना शिक्षण विभागातील समस्या व त्रुटी सांगितल्या. सदर विषयाबाबत उपाययोजना करावी अशी मागणी केली. ग्रामीण भागातील विध्यार्थी दहावी पास झाल्यानंतर त्यांना पुढील शिक्षणाकामी खूप मोठ्या अडचणींनाचा सामना करावा लागतो. पर्यायाने शिक्षण थांबते. अकरावी, बारावी नंतर उच्च शिक्षणासाठी देखील गोरगरीब विध्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यासाठी मोठा सामना करावा लागतो. आमच्या निवेदनाचा सविनय विचार करून गोरगरीब विध्यार्थ्याना न्याय मिळवून दयावा अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक तथा कुऱ्हेगावचे माजी उपसरपंच जयराम गव्हाणे, विशाल आहेर, रवींद्र पाडेकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.