Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

निफाड तालुक्यातील नांदगाव येथील रस्त्यांबाबत मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन

 

विंचूर/प्रतिनिधी  - 

महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना नुकतेच राष्ट्रवादीच्या निफाड तालुका महिला उपाध्यक्षा मनिषा वाघ यांनी नांदगाव (ता.निफाड) येथील विविध समस्यांचे लेखी निवेदन प्रत्यक्ष भेटून दिले आहे.

नांदगाव येथील देवगाव, कानळद् रस्ता रुंदीकरण ,काँक्रिटीकरण करण्याची मागणी प्रामुख्याने या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच देवगाव ते नांदगाव रस्ता बर्‍याच वेळी मंजूर होऊन स्थानिक लोकांमुळे अडचणी येतात पुन्हा कामांना ब्रेक लागतो त्यामुळे नांदगाव ते देवगाव रोड चे काम हें पोलीस संरक्षणात व्हावे अशी देखील मागणी मनीषा वाघ यांनी निवेदनात केली.

यावेळी सर्व कामे मार्गी लागतील यात कुठलीही अडचण येणार नाही. लवकरच सर्व कामे मंजूर होतील असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.