विंचूर लासलगावसह सोळागाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सोळा गावांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा होणार नाही असे विंचूर ग्रामपंचायतीने जाहीर केले. गेल्या एक महिन्यापासून पाणी येत नसल्याने नागरिक संतप्त होते त्यातच पुन्हा पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा होणार नाही असे जाहीर करतात ग्रामस्थांचा सहनशीलतेचा बाण फुटला व महिलांनी हंडा मोर्चा व उपोषणाचा इशारा दिला. तसेच विंचूर प्रेस क्लबच्या सदस्यांनी याबाबत पुढाकार घेऊन अधिकार्यांशी मोबाईलद्वारे विचारणा केल्याने सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली.
गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी तातडीने संबंधित सर्व अधिकारी एम.जी.पी.चे अभियंता, उप अभियंता, ठेकेदार व ग्रामविकास अधिकारी यांना फोन करून सर्वांना प्रत्यक्ष कामावर बोलून कामाची पाहणी केली व संबंधितांना सूचना दिल्या. तसेच विंचूर ग्रामपंचायतचे सरपंच सचिन दरेकर ग्राम विकास अधिकारी जी. टी.खैरनार यांनी तातडीने बैठक बोलून यावर तातडीने काय उपाय योजना करावे याबाबत सरपंच व सदस्य यांना अवगत केले.ग्रामपंचायतीने तातडीने पाईपलाईन फुटले त्या ठिकाणी जाऊन सामाजिक कार्यकर्ते इम्रान मोमीन यांनी संबंधित शेतकर्याला विनंती करून पाईप फुटून बाहेर येणारे पाणी आम्ही बाजूच्या नाल्यात सोडण्याची व्यवस्था करतो परंतु आम्हाला तातडीने पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने मोटारी पंप चालू करण्यासाठी व आपल्या शेतात पाणी साठणार नाही याची आम्ही काळजी घेऊ शेतकर्यांनी सुद्धा मोठ्या मनाने ही विनंती मान्य केल्याने ग्रामपंचायत ने ताबडतोब पाणीपुरवठा सुरू केला व दोन दिवसात संपूर्ण गावाला पाणीपुरवठा झाला. तसेच 16 गाव पाणीपुरवठ्याची नवीन पाईपलाईन चे काम सुरू आहे ते काम लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने अधिकार्यांनी कामाची पाहणी करून कोठे कोठे काम बाकी आहे त्यासाठी काय करावे लागेल व काम लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने ठेकेदार कैलास काळे यांना सूचना केल्या.
प्रत्यक्ष नांदूर मधमेश्वर बंधार्यावर जाऊन जिथे जिथे काम अपूर्ण आहे त्या कामाची पाहणी केली व काम लवकर होण्याच्या दृष्टीने सर्व अधिकार्यांनी काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी महेश पाटील, शाखा अभियंता एम.जी.पी. पी. एस. पाटील, उप अभियंता एम.जी.पी. विवेक निकम, शाखा अभियंता बिन्नर साहेब, उपअभियंता ग्रामपंचायत पाणीपुरवठा शिंदे साहेब, सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचे काम करणारे ठेकेदार कैलास काळे, विंचूर ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी जी.टी. खैरनार आदि उपस्थित होते यावेळी गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी आठ दिवसांनी कामाचा आढावा घेण्याचे सांगितले.


