शिवशाही संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष अँड रोहित उगले यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीच्या तहसीलदारांना निवेदन
इगतपुरी ( प्रतिनिधी )
मणीपुरात महिलांवर अमानुषपणे अत्याचाराची घटना अतिशय निंदनीय असून मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेचा शिवशाही संघटनेने निषेध व्यक्त करीत असे कृत्य करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शिवशाही संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष अँड रोहित उगले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की शिवशाही ही संघटना तालुक्यात जनसामान्यसाठी अविरतपणे काम करीत असून मणिपूर राज्यात घडलेल्या महिलांवरील प्रसंगाचा इगतपुरी तहसील कार्यालयासमोर शिवशाहीने जाहीर निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्यात भाजपने पुरती वाट लावली असून प्रत्येक राज्यात वेगवेगळे गुन्हे घडत असतात भाजपचे सरकार मात्र सुस्तच आहे. यावेळी भाजप सरकारचा देखील निषेध करण्यात आला सदर आरोपींना पकडून लवकाराच्या लवकर फाशी देण्यात यावी तसेच देशात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शिवशाही संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष अँड रोहित उगले, मनोज पथवे, रवींद्र भोर, भास्कर खडके, गोविंद हाडप, शिवराम पथवे, नंदनाथ काळचिडे, गोकूळ पाचारणे, सुरेश बोराडे, सुकदेव पथवे, किशोर वाळकंदे, पदमाकर कडु, अदिनाथ पिंगळे, रामा पारधी आदी उपस्थित होते.


