Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

सप्तशृंगी गडावर चैत्र पौर्णिमेसाठी नियोजन बैठक संपन्न

सोमनाथ मानकर, सप्तशृंगी गड

 श्री क्षेत्र सप्तशृंगीगड येथे सप्तशृंगी निवासिनी देवीचा चैत्रोत्सव 30 मार्चपासून सुरू होणार आहे. गडाच्या शिखरावर 4 एप्रिल रोजी कीर्तिध्वज फडकणार आहे. तर 6 एप्रिलपर्यंत उत्सव सुरू राहणार आहे. चैत्रोत्सवाची नियोजन बैठक गडावर झाली. यात्रेच्या नियोजनासाठी विविध शासकीय, अशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व विश्वस्त संस्थेच्या विविध विभागांची बैठक कळवणचे सहायाक् जिल्हाधिकरि विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत झाली.

या बैठकीत यात्रा नियोजन विविध विभाग व त्यांचे तालुका, जिल्हा व विभागस्तरावरील विविध अधिकारी व कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ आदींसह चर्चा करण्यात आली. तहसीलदार बंडु कापसे यांनी सूचना दिल्या. तसेच शासकीय व निमशासकीय विभागातील पदाधिकाऱ्यांनी यात्रेसंदर्भात केलेल्या नियोजनाची माहिती तसेच संभाव्य आवश्यकता बाबतचे तपशील सादर केले.

चैत्रोत्सवात चौदसच्या दिवशी मंगळवारी (दि. 4 एप्रिल) भगवतीच्या कीर्तिध्वजाचे विधिवत पूजन होऊन गवळी परिवारातील प्रतिनिधींच्या माध्यमातुन्

 भगवतीच्या पर्वत शिखरावर सदर दिवशी रात्री ध्वजारोहण होणार आहे, अशी माहिती देवस्थानच्या वतीने सभेत देण्यात आली.

यावेळी कळवण पोलीस निरीक्षक समाधान नांगरे, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, विश्वस्त संस्थेचे विश्वस्त ललित निकम कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर भिकन वाबळे व देवी संस्थानचे सर्व अधिकारी कर्मचारी, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली गायकवाड, वन परीमंडळं अधिकरी धनराज बागुल  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण, उपविभागीय रुग्णालय अधीक्षक डॉ. असिक शेख, राज्य उत्पादन शुल्क मुख्य निरीक्षक ए. बी. सोनार, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गो.वी. कासार, राज्य परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रक 

आगार व्यवस्थापक हेमंत पगार, सार्वजनिक विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी ए. जी. गायधनी, ए पवार, राज्य विद्युत महामंडळ अधिकारी

पी. एस. उगलमुगले, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी,  सरपंच सप्तशृंगगड रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक पदाधिकारी रोपवे  व्यवस्थापक लुंबा व पदाधिकारी तसेच गडावरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सर्व शासकीय प्रशासकीय अधिकारी आपत्ती व्यवस्थापन नाशिक जिल्हाधिकारी कर्मचारी पदाधिकारी महाराष्ट्र मंडळ सुरक्षा रक्षक कर्मचारी पदाधिकारी ग्रामसेवक उपस्थित होते. मागच्या वर्षी नवरात्र उत्सव काळामध्ये बसेस मुळे वाहतुकीला कोळंबा झाला होता त्यामुळे अनेक भाविकांना व ग्रामस्थांना याचा मनस्ताप सहन करावा लागला होता असे परत होऊ नये याकरता एसटी महामंडळ यांना सक्त ताकिद देण्यात आलेले आहे  सर्व बसेस ह्या मेटॅनेस करूनच गडावरती सोडण्यात यावे तसेच सप्तशृंगी गडावर लाखोच्या संख्येने भावीक गडावर  पायी. येत असतात त्या भाविकांना सप्तशृंगी देवी संस्थान व सप्तशृंगी गड ग्रामपंचायत यांनी जागोजागी पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छता करण्यात यावी व रस्त्यावरती कुठल्या अतिक्रमण करण्यात येऊ नये ते आसल्यास सदर अतिक्रमण हे स्वतः ग्रामपंचायत ने कारवाई करावी असे साय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवडे व इतर पदाधिकारी यांच्याकडून सप्तशृंगी ग्रामपंचायत यांना सांगण्यात आले तसेच शिवालय तलावाच्या परिसरात भाविकांना रात्रीच्या वेळेस थांबण्यासाठी राहूटी करण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा पाण्याचे टँकर लावण्यात यावे तसेच या वेळेस गडावरती येणाऱ्या भाविकांचा ओघ लक्षात घेता सर्व सुविधा पुरविण्यात यावी अशी तंबी त्यावेळेस शासकीय अधिकारी यांना देण्यात आलेली आहे परंतु आता प्रश्न असा निर्माण होतो की खरंच या ठिकाणी मीटिंगसाठी उपस्थित राहिलेले अधिकारी हे सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरावडे यांच्या शब्दाला योग्य न्याय देतील का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे

यात्रा उत्सव काळा सह इतर दिवशी सुद्धा या ठिकाणी असलेल्या मोबाईल नेटवर्क यांना कायम अडचण असते त्यामुळे भाविकांना ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करता येत नाही याला कित्येक दिवसाची समस्या असून अनेक वेळेस तक्रारी करून झालेले असून अनेक प्रसार माध्यमांनी सुद्धा बातम्या लावून सुद्धा या ठिकाणी असलेल्या नेटवर्क टावर आहेत एअरटेल आयडिया वडाफोन जिओ यांना कुठलाही प्रकारचा पश्चाताप होत नाही तसेच या ठिकाणी एटीएम असून या एटीएम ला सुद्धा कधी रेंज नसती तर कधी पैसे नसते त्यामुळे या ठिकाणी सुद्धा भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो निदान आता तरी यात्रेमध्ये सर्व मोबाईल नेटवर्क टावरला नेटवर्क मिळवून सर्व ऑनलाईन पैसे ट्रान्सफर होतील का तसेच या ठिकाणी यात्रेच्या काळामध्ये लाखोच्या संख्येने भाविक गडावरती येत असतात यामध्ये लहान मुले हरवणे वयस्कर व्यक्ती हरवणे या गोष्टी सर्रास घडत असतात यावेळेस संपर्क साधण्यासाठी जर मोबाईल ला नेटवर्क नसेल तर सदर व्यक्ती मिळणार कशी हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. निदान यात्रेच्या काळा वधीमध्ये तरी सर्व मोबाईल नेटवर्कच्या अधिकाऱ्यांना लाज वाटून व्यवस्थित नेटवर्क मिळेल का अशी शंका या ठिकाणी ग्रामस्थ व भाविकाना पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.