Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

राजापूर जवळ अपघातात मोटारसायकलस्वार ठार

 लक्ष्मण घुगे, राजापूर प्रतिनिधी...

येवला  तालुक्यातील राजापूर येथे अलगट वस्ती कोळझिरा  जवळ मोटरसायकल  क्रेटा गाडी यांच्यामध्ये समोरा समोर जबर धडक झाली असल्याने पन्हाळसाठे  येथील भिमा गंगाधर साळुंखे पनहाळसाठे   हे गंभीररितया  जखमी झाले असुन पुढील उपचारासाठी येवला  ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. डोक्याला मार लागलेला असुन  घटनास्थळी आमदार नरेंद्र दराडे  हे येवला कडे जात असताना दराडे   यांनी तात्काळ रुग्णवाहिका यांना पाचारण केले . राजापूर वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन कुटे यांनी घटनास्थळी येऊन जखमींस पुढील उपचारासाठी येवला येथे पाठवले.  घटनास्थळी रविंद्र अलगट, सुभाष वाघ,  समाधान आव्हाड,  यांनी प्रथम घटनास्थळी मदत केली . केरटा गाडी ,एम एच04के आर 5982  ही नांदगाव कडून येवल्याकडे जात असताना पन्हाळसाठे येथील रहिवासी भिमा साळुंखे हे राजापूर कडे एम एच 41ए सी 4992 या मोटारसायकल ने  जात असताना अलगट वस्ती जवळ कोळझिरा येथे हा अपघात झाला. अपघात इतका भिषीन  होता. कि  क्रेटा गाडीचा पुढील भाग चक्काचुर झाला आहे. मोटारसायकलस्वार गंभीररित्या जखमी आहेत. घटनास्थळी येवला पोलीस कॉन्स्टेबल मोरे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.