न्यू ब्लाॅसम्स इंग्लिश स्कूलचे वर्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
February 07, 2023
0
विंचूर (प्रतिनिधी) - येथील न्यू ब्लाॅसम्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वर्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन, सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विंचूर ग्रामपालिकेचे सरपंच सचिन दरेकर, उपसरपंच शिरीन मोमीन, लासलगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष असिफ पठाण, निलेश देसाई,उमेश पारिक, विंचूर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष संदीप शिरसाट, नितीन गायकवाड,कलगीधर इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य दिपक बाबरे हे होते.स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. इयत्ता नर्सरी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी भूक लगी,आज की पार्टी,भूत चढीया,जाऊ नको ऑफिस,मेरा जुता है, मल्हारी लाजहारी, सेव्ह ट्रीज,सेनोरिटा,नाचो नाचो, सोलो डान्स,गलतीसे मिस्टेक, मिशन मंगलम, लुंगी डान्स,गल्ला गुडिया, खेळ मांडला, तानाजी डान्स,स्पोर्ट थिम,आर्मी सॉंग आदीं मराठी हिंदी चित्रपटातील गाण्यांवरील नृत्याविष्कारासह विविध देशभक्तीपर पथनाट्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दरम्यान स्काॅलरशीप स्पर्धा, इंग्रजी ऑलंपियाड स्पर्धा, तसेच विविध खेळांच्या स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्याना पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अँड संजय दरेकर,उपाध्यक्ष संतोष उशिर, सचिव अविनाश दुसाने, संचालक सतिष सांगळे, कैलास भालेराव, चंद्रकांत साईनकर, संजय झाल्टे, लता कोथमिरे, सुभाष उगले, दिलीप कोथमिरे न्यू ब्लॉसम्स इंग्लिश मिडीयम स्कूलचा प्राचार्या ज्योती माठा, समर्थ प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पूजा निकम,समन्वयक माधवी सहाय, शालेय सांस्कृतिक समितीचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल संसारे,स्वरूपा कापडणीस, प्रतिक्षा दहिफळे, संस्कृती ठुबे, सेजल शेवाळे यांनी केले.तर प्राचार्या ज्योती माठा यांनी आभार प्रदर्शन केले.


