खंडेराव महाराजांची याञा बारा गाड्या ओढून उत्साहात साजरी
February 05, 2023
0
विंचूर, ता.०५
विष्णूनगर ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या खंडेराव महाराजांची याञा बारा गाड्या ओढून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सालाबादप्रमाणे विष्णूनगर येथे माघ शु.पौर्णिमेला खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन करून बारागाड्या ओढून यात्रा भरविली जात असते.त्याप्रमाणे यंदा ता.०५ रोजी जय मल्हार वाघे मंडळाच्या वतीने याञेचे आयोजन करण्यात आले होते.दुपारी तिन वाजेच्या दरम्यान खंडेरायाची पालखी, गंगाजल कावडी व खंडेराव काठींचे वाजतगाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर खंडेराव महाराजांना स्नान, अभिषेक,आरती, त्यानंतर मांडवडहाळे, तदनंतर गावातील मुख्य रस्त्याने खाण्यागोण्याची फेरी व सायंकाळी संपूर्ण गावातून मोठी फेरी काढण्यात आली. सायंकाळी पाच वाजता गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून खंडेराव महाराज मंदिरा पर्यंत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला.ह्या वर्षी बारा गाड्या ओढण्याचा मान गणेश कचरू घायाळ यांना मिळाला.
उत्सवानिमित्ताने खंडेराव महाराज मंदिर परीसरात तसेच गावात स्वच्छतेबरोबरच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

