Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचे विंचूरला स्वागत

विंचूर (प्रतिनिधी) - थायलंड येथून आलेल्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचे येथील सिद्धार्थ मित्र मंडळ, माता रमाई महिला मंडळ, लासलगाव येथील यशोधरा महिला मंडळ, फुले,शाहू आंबेडकर बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.थायलंड येथून सुमारे ११० बौद्ध भिक्खू तथागत गौतम बुद्धांच्या २५०० वर्षापुर्वीचा अस्थिकलश घेऊन परभणी येथे आले होते.
बौद्ध भिक्खूंची परभणी येथून अस्थिकलश घेऊन दादर चैत्यभूमी कडे मार्गक्रमण करीत निघालेली पदयात्रा येथे आली होती. अस्थिकलश व पदयात्रेची वाद्यांच्या गजरात विंचूर गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. अस्थिकलश यात्रा व पादयात्रेचे विंचूरकर नागरिकांच्या वतीने सडा रांगोळी काढून व पुष्प वर्षावात स्वागत करण्यात आले. येथील सिद्धार्थ कॉलनीत मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी बौद्ध भिक्खूंचे धम्म प्रवचन झाले. तसेच पदयात्रेचे आयोजक सिद्धार्थ हत्ती हंभीरे व अभिनेते गगन मलिक यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विंचूर येथील सिद्धार्थ मित्र मंडळ, माता रमाई महिला मंडळ, लासलगाव येथील यशोधरा महिला मंडळ, फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय संस्था आदींसह विंचूर, लासलगाव व पंचक्रोशीतील बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.