विंचूर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
January 24, 2023
0
विंचूर दि.२४ (संदीप शिरसाट)
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील सन १९९१ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा येथील अपर्णा प्राईड लॉन्स व मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी विंचूरकर मित्रांच्या वतीने बाहेर गावाहून आलेल्या मित्र मैत्रिणींचे स्वागत करण्यात आले. तद्नंतर दिवंगत सहाध्यायी मित्र व मित्रांच्या परिवारातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने ३२ वर्षा नंतर एकत्र आलेल्या मित्र मैत्रिणींनी गप्पा गोष्टी करत स्वपरिचय दिला.यावेळी अविनाश दुसाने यांनी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात नित्याचे ताणतणाव व संघर्षाच्या पार्श्वभूमीवर असे स्नेह सम्मेलन मानसिक ऊर्जा देतात. त्यामुळे वर्षातून किमान एकदा तरी स्नेह सम्मेलनाच्या माध्यमातून सर्व मित्रांनी एकत्र यावे.असे प्रतिपादन केले.तर वैशाली देवरे यांनी आपल्या मनोगतातून जून्या आठवणींना उजाळा दिला.व उषा वाघमारे यांनी मैत्रीच्या ऊर्जेने कोरोना सारख्या आजारातून सावरण्याचे बळ मिळाले.असे सांगितले.तसेच विनोद ढवण यांच्या विनोदांनी उपस्थितांचे मनोरंजन केले.यावेळी सर्व मित्र मैत्रिणींनी समुह भोजनाचा आस्वाद घेतला.व येथील ग्रामदैवत तसेच तत्कालीन सहलीचे ठिकाण असलेल्या लोणजाई गडास भेट देऊन लोणजाई मातेचे सामुहिक दर्शन घेतले.अखेरीस विंचूर विद्यालयास भेट देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी अविनाश दुसाने, संदीप शिरसाट, दिपक राऊत,संतोष उशीर, नितीन जेऊघाले, विष्णू मवाळ, मीनल पारिख, उषा वाघमारे, वैशाली देवरे, रोहीणी कापसे,कल्पना नेवगे, मनिषा भावसार,सुगंधा नेवगे, आशा आव्हाड, शारदा पवार, संगिता सोनवणे, मनिषा दराडे, मीना काळे,संजय ठाकरे,वाल्मिक सोनवणे, जितेंद्र पुंड, संतोष स्वामी, दिनेश आहेर, किशोर दरगुडे, संतोष महाले,भागीरथ खैरनार, नंदू सानप, अशोक मरकड, रुपेश राठी,जाहिद मन्सुरी, गणपत नेवगे, जावीद शहा,सतिष नेवगे,राहुल संघवी, शाम ढोमसे, विनोद ढवण आदींसह विंचूर, नाशिक, पुणे, मुंबई, आंबेजोगाई, सोलापूर, कळवण येथील मित्र मैत्रिणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदीप शिरसाट यांनी तर अविनाश दुसाने यांनी आभार प्रदर्शन केले.

