Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ देवळा तालुकाध्यक्षपदी जगदीश निकम तर सरचिटणीसपदी मनोज वैद्य..!

देवळा [प्रतिनिधी]-
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि.नाशिक च्या तालुकाध्यक्षपदी दै.दिव्य मराठी चे जगदीश निकम तर सरचिटणीसपदी दै.देशदूत चे मनोज वैद्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि.नाशिक च्या देवळा विद्यमान तालुकाध्यक्ष वैभव पवार यांची खामखेडा ता.देवळा सरपंचपदी थेट जनतेतून भरघोस मतांनी निवडून झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हा मराठी पत्रकार संघाकडे सुपूर्द केला. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या तालुकाध्यक्षपदी काल [दि.२२] दै.दिव्य मराठी चे प्रतिनिधी व विद्यमान सरचिटणीस जगदीश निकम यांची निवड करण्यात आली तर त्यांचा तालुकाध्यक्ष निवडीमुळे रिक्त झालेल्या सरचिटणीसपदी दै.देशदूत चे प्रतिनिधी मनोज वैद्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार व जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा पदाधिकारी दिनकरराव आहेर व माजी तालुकाध्यक्ष विशाल मराठे यांनी काम पाहिले.तालुकाध्यक्ष व सरचिटणीस पदाची निवडणूक वगळता अन्य कार्यकारिणी कायम ठेवण्यात आली. याप्रसंगी मावळते तालुकाध्यक्ष तथा नवनिर्वाचित खामखेडा सरपंच वैभव पवार,वाखारवाडी ग्रा पं.सदस्य व नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष जगदीश निकम,सरचिटणीस मनोज वैद्य तसेच मविप्र संस्थेचे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य वैभव केदारे यांचा संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रतिनिधी विनोद पटणी,चंद्रशेखर कापसे,एकनाथ सावळा,वैभव केदारे,महादू मोरे,विशाल पाटील,प्रवीण आहेर,ज्ञानेश्वर आढाव ,माधव सिरसाट आदींसह सभासद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.