न्यू ब्लाॅसम्सचा साई शिरसाठ शिष्यवृत्ती परिक्षेत तालुक्यात आठवा
January 06, 2023
0
न्यू ब्लाॅसम्सचा साई शिरसाठ शिष्यवृत्ती परिक्षेत तालुक्यात आठवा
विंचूर दि.६(प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत येथील न्यू ब्लाॅसम्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या साई पुरुषोत्तम शिरसाठ या विद्यार्थ्यांने निफाड तालुक्यात आठवा क्रमांक पटकावला.साईने शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. शिष्यवृत्ती परिक्षेसाठी न्यू ब्लाॅसम्स इंग्लिश मिडीयम च्या मुख्याध्यापिका ज्योती माठा, समर्थ प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पूजा निकम, समन्वयक माधवी सहाय, संगीता जगताप, जयश्री नेवगे या शिक्षिकांनी विद्यार्थ्यांकडुन तयारी करून घेतली होती.साईच्या या यशाबद्दल सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अँड.संजय दरेकर, सचिव अविनाश दुसाने तसेच सर्व संचालक मंडळाच्या वतीने कौतुक करण्यात आले.

