'गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीच्या आधुनिक पद्धती' या विषयावर तीन दिवसाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम
January 14, 2023
0
शरद लोहकरे, लासलगाव
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठा अंतर्गत बांद्रा, मुंबई येथील तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र हे मत्स्यव्यवसायक्षेत्संशोधन व विस्तार कार्य करणारे उत्तर कोकण किनारपट्टीवरील एक अग्रणी केंद्र आहे. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर विकसित होणारे संशोधन प्रत्यक्ष्य लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे, मत्स्यशेतीबाबत कौशल्य विकास व्हावा या उद्देशाने या केंद्रामार्फत राज्यातील शेततळी, तलावधारक शेतकन्यासाठी गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीच्या आधुनिक पद्धती या विषयावर तीन दिवसाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम १५ ते १७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत पनवेल येथिल तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, प्रक्षेत्र, साईनगर येथे आयोजित करण्यात येत आहे. प्रशिक्षणा दरम्यान शेतकऱ्याना व्यापारीदृष्ट्या महत्वाच्या माशांच्या जाती, तलावांसाठी जागेची निवड व बांधकाम, बीज संगोपन, तलावांची पूर्व तयारी, बीज वहातूक व साठवणूक, नैसर्गिक खाद्य निर्मिती व कृत्रिम खाद्य व्यवस्थापन, पाण्याचा दर्जा व्यवस्थापन, पोचा कोळंबी संवर्धन, एकलिंगी तीलापीया माशांचे संवर्धन, पिंजर्यातील मत्स्य संवर्धन, जिताडा संवर्धन, महाराष्ट्र शासनाच्या व नीलक्रांती योजना, मत्स्य शेतीचे अर्थशात्र व प्रकल्प अहवाल अशा विविध विषयांवर प्रात्यक्षिकाद्वारे विषयतज्ञामार्फत मार्गदर्शन करण्यात येईल. ज्या शेतकर्याना प्रशिक्षणात भाग घ्यायचा आहे त्यांनी संशोधन केंद्राशी या क्रमांकावर व इमेलवर (tmbrs@rediffmail.com) संपर्क साधावा.असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
