विंचूर, दि.७ (प्रतिनिधी)
 |
| मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना मान्यवर |
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील सन्मित्र ज्येष्ठ नागरिक संघ, प्राथमिक आरोग्य केंद्र व एस.एम.बी.टी.हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ज्येष्ठ नागरिक भवनात नाक,कान घशाच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.सदर शिबिरात एस.एम.बी.टी. हॉस्पिटलचे नाक, कान, घसा तज्ञ डॉ सौरभ यादव, डॉ.अजिंक्य शेळके, डॉ.संदीप पाचरणे, डॉ.सचिन आडके, डॉ.रोहीणी व डॉ लिना यांनी पंचाऐंशी (८५) रुग्णांची तपासणी केली. यावेळी निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अविनाश पाटील,विंचूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ सचिन पवार, सन्मित्र ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामनाथ दरेकर, उपाध्यक्ष युसुफ पठाण, मुरलीधर निकाळे, गोपीनाथ खैरे,बाळकिसन मालपाणी, भाऊसाहेब संधान, धोंडीराम शंखपाळ,मुलानी, भास्कर दरेकर, शरद महाजन, सुरेश नारायणे, मोनाली गाजरे, पंकज पुंड, संजय अवतार, रेणुका मोरे,सागर बडवर आदींसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भाऊसाहेब संधान यांनी तर गोपीनाथ खैरे यांनी आभार प्रदर्शन केले.
