Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

राष्ट्रनिर्माण धर्म सोहळ्याची ओझरला होणार सांगता !

ओझरसह, वेरूळ, पुणतांबा, गोंडगाव येथे श्रीसंत सदगुरू शांतिगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत सोमवारी राष्ट्रनिर्माण धर्म सोहळ्याची सांगता !

ओझर : प्रतिनिधी

निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज  धर्मपीठाचे पीठाधीश्वर  समर्थ उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरनेने व प्रमुख उपस्थितीत सुरू असलेल्या राष्ट्रनिर्माण धर्म सोहळ्याची सांगता आज सोमवार दिनांक ५ डिसेंबर रोजी ओझरसह वेरूळ,गोंडगाव,पुणतांबा येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

     कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्यस्मरणार्थ समर्थ उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरनेने आणि प्रमुख उपस्थितीत ओझरच्या जनशांती धामात देव-देश-धर्मासाठी सुरू असलेल्या राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा गेल्या आठवड्या भरापासून मोठ्या उत्साहात सुरू आहे.यासोहळ्यात महाजपानुष्ठान,अखंड नंदादीप,हस्त लिखित नामजप,रोज पहाटे ५ वाजता ब्रम्हमुहूर्तावर नित्यनियम विधी,प्राणायाम,ध्यान,भागवत वाचन,महाआरती,भजन,प्रवचन, सत्संग यांसह विविध कार्यक्रम सुरू आहेत.

२८ नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या या सोहळ्याची सांगता  ओझरसह वेरूळ, गोंडगाव, पुणतांबा येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.आज सोमवार दिनांक ५ डिसेंबर रोजी या भव्य-दिव्य धर्म सोहळ्याची सांगता संपन्न होणार आहे.यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत लक्षवेधी पालखी मिरवणूक,सदगुरू पाद्य पूजन, संत-अतिथी-ब्राम्हण पूजन,प्रवचन,सत्संग,भजन यांसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.