Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

नाशिकला २५ डिसें. रोजी तेली समाजाचा वधू-वर मेळावा

SANDIP SHIRSATH, VINCHUR
नाशिक महानगर तेली समाजाच्या वतीने रविवार दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० ते सायं. ६:०० या वेळेत श्रद्धा लाँन्स, कै.यादवराव वाघ नगर गंगापूर-मखमलाबाद लिंक रोड पंचवटी नाशिक येथे राज्य स्तरीय वधू-वर व पालक परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्याचे ३३वे वर्षे असून उत्तरोत्तर प्रतिसाद वाढत आहे. यावर्षी मेळाव्याच्या अखेरच्या नोंदणी दिनांका पर्यंत ३१६० उपवर वधू वरांची मेळाव्यामध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. मेळाव्या मध्ये सहभागी होणाऱ्या वधू-वरांना रंगीत परीचय पुस्तिका देण्यात येणार आहे.विवाहाच्या रेशीम गाठी स्वर्गातच बांधल्या जातात असे म्हणतात परंतु आजच्या काळात वधू व वर उच्च शिक्षित झालेले आहेत. उच्च शिक्षणामुळे वधू वरांच्या जोडीदारांंबद्दलच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. या अपेक्षांची पुर्तता करतांना पालकांचा पैसा व वेळ दोन्हींचाही अपव्यय होतो. परंतु या मेळाव्याच्या रुपाने पालकांची होणारी ही दमछाक कमी होते. व वधू वरांनाही एकाच ठिकाणी व एकाच वेळी आपल्या आवडी निवडी नुसार अनेक सुयोग्य पर्याय उपलब्ध होत असल्याने आजवर अनेक उपवर वधुवरांना मेळाव्याच्या माध्यमातून सुयोग्य जोडीदार मिळाले आहेत. तरी ज्या पालकांकडे उपवर वधू - वर असतील त्यांनी आपल्या पाल्यासह मेळाव्यास उपस्थित रहावे. असे आवाहन मेळावा सचिव सुनिल शिरसाट यांनी केले आहे. मेळावा यशस्वीतेसाठी नाशिक म.न.पा. नगरसेवक तथा मेळावा कार्याध्यक्ष गजानन शेलार,तेली समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा ना.म.को.बॅंकेचे संचालक भानुदास चौधरी, नाशिक शहराध्यक्ष मिलिंद वाघ, उपाध्यक्ष उत्तमराव सोनवणे, प्रमुख संयोजक नितीन व्यवहारे, संयोजिका सरिता सोनवणे, सचिव सुनिल शिरसाट, खजिनदार हेमंत कर्डिले, पुस्तिका प्रमुख वैशाली शेलार, माजी महापौर अँड यतीन वाघ, कैलास पवार,प्रविण चांदवडकर, आदी प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.