६ जानेवारीपासून मतोबा महाराज यात्रेस प्रारंभ
December 20, 2022
0
नैताळे (प्रतिनिधी) -
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे यात्रोत्सव येत्या ६ जानेवारीपासून सुरू होत आहे. ट्रस्टकडून मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली असून यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
नासिक- औरंगाबाद महामार्गावर वसलेली अति प्राचीन गाव नैताली या गावी चारशे वर्षांपूर्वी श्री मतोबा महाराज या संत महापुरुषांनी जिवंत समाधी घेतली तेव्हापासून या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून एक ऐतिहासिक गाव म्हणून या गावाची संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ओळख आहे.
नाशिक- औरंगाबाद या महामार्गावरील नैताळे (ता. निफाड) येथे दरवर्षी पौष पौर्णिमेला नैताळेकरांच्या आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री मतोबा महाराजांचा अखंड पंधरा दिवस चालणारा यात्रोत्सव भरविला जातो. यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री मतोबा महाराजांची महापूजा व रथ पूजेसह धार्मिक कार्यक्रम होणार आहे. नैताळे ग्रामपंचायतीतर्फे रथ मिरवणूक मार्गाने असलेल्या अडी- अडचणी सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न सुरु आहेत. मंदिर परिसरात साफसफाई केली जात असून भाविकांच्या पिण्याची पाण्याची सोय, बाहेर जाण्याचा मार्ग, प्रसादाचे असणारे स्टॉल, याबाबत ग्रामपंचायत व ट्रस्ट नियोजन करत सहा जानेवारीपासून यात्रोत्सवात प्रारंभ होत असून कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर यंदाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात होणार आहेत. त्याअनुषंगाने संपूर्ण नियोजन केले जात आहे. मतोबा महाराज मंदिराला आतील बाजूने व बाहेरील बाजूने वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे.यंदा यात्रोत्सवात दहा लाख भाविक १५ हजेरी लावतील असा अंदाज करून ग्रामपंचायत व्यवस्थापन करीत आहे. भाविकांसाठी विविध सोयीसुविधा ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आल्या आहेत अशी माहिती सरपंच निशा पाठक यांनी दिली आहे.

