नाशिक -
वंचित जनतेची संख्या मोठी असल्याने छोट्या प्रसारमाध्यमांचा प्रभाव शाश्वत राहतील - डॉ. डि.एल. कराड
रिपब्लिकन वार्ताचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा
देशाचा विकास झपाट्याने होत असता लाभाचा वाटा मुठभर उद्योजक घराण्यांकडे जातो आहे.आजची मोठी बहुतेक वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या इतर प्रसार माध्यमे मोठ्या भांडवलदारांच्या ताब्यात असल्याने सामान्य माणसाच्या समस्यांना छोटी व स्वतंत्र वृत्तपत्रे हात घालु शकतात. गरिब वंचित जनतेची संख्या मोठी असल्याने त्यांनी ठरवले तर छोट्या प्रसारमाध्यमाचा प्रभाव शाश्वत राहतील. असा आशावाद मा.क.पा.चे राष्ट्रीय नेते कॉम्रेड डॉ .डि.एल. कराड यांनी मांडला.
रिपब्लिकन वार्ता या वृत्तवाहिनीच्या व साप्ताहिकाच्या व्दितीय वर्धापनदिनाच्या सोहळ्यानिमित्त सिडकोच्या सिंहस्थनगरातील मायको हॉल येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डाॅ कराड संबोधित करित होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सहाय्यक मनपा आयुक्त डॉक्टर मयूर पाटील, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आण्णासाहेब कटारे, सुप्रसिद्ध हृदयतज्ञ डॉ.अनिरुध्द धर्माधिकारी,यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे पत्रकारिता समन्वयक श्रीकांत सोनवणे,पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पगारे, उपनिरीक्षक मिलिंद तेलूरे, वंचित बहुजन आघाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे, दिपचंद दोंदे, विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, संपादक डॉ अनिल आठवले, कार्यकारी संपादक सलिम सय्यद,आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रा. व्यंकटराव कांबळे यांनी केले तर संपादक डॉ.अनिल आठवले यांनी आपल्या मनोगतात राज्यभरातील वार्ताहराच्या मदतीने वंचीत जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नांचा आढावा घेत प्रत्येक वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्तींना शाब्बासची थाप देत समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते ही बाब आमच्यासाठी खूप मोलाचे आहे असेही त्यांनी सांगितले.
रिपब्लिकन वार्ता द्वितीय वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते रिपब्लिकन वार्ताच्या द्वितीय वर्धापन दिन विशेषांकाचा प्रकाशन सोहळा यावेळी संपन्न झाला.
या कार्यक्रमात रिपब्लिकन पक्षाचे नगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉ. मयूर पाटील,राष्ट्रीय अध्यक्ष आण्णासाहेब कटारे, सुप्रसिद्ध हृदय तज्ञ डॉ.अनिरुध्द धर्माधिकारी , यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे पत्रकारिता समन्वयक श्रीकांत सोनवणे,पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पगारे , वंचित बहुजन आघाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे, दिपचंद दोंदे, विश्वगामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम याचेही मार्गदर्शनपर भाषणे झाली.
कोणतेही शुल्क पैसे न घेता या वृत्तसमुहाने विविध क्षेत्रातील 106 यशवंताचा शाल ,मानचिन्ह , प्रशस्तीपत्र,पुष्पगुच्छ व मानाचा फेटा बांधून यथोचित सत्कार केला. प्राचार्य डॉ. फारुख शेख यांनी सत्काराला उत्तर देतांना रिपब्लिकन वार्ताचे आभार मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेरोशायरीच्या अंदाजात बाळासाहेब शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रा. व्यकंटराव कांबळे ,आनंद दाभाडे, जनार्दन गायकवाड, राजेश ढोले ,अकबर शहा, सुनिल अडसूळ, कैलास श्रावणे, हनुमान लसंते, युवराज हंगेकर, सुनिल आठवले, राजाभाऊ कपाळे, गणेश वाडेकर, मनोज मुंडे, अनिल कलंके, आदीनीं विषेश परिश्रम घेतले.


