विंचूर -
शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी के. बी. पी. प्राथमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा संपन्न झाला.
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच खरेदी विक्रीचे व्यवहार कळावे व प्रत्यक्ष व्यापार कसा करावा याचा अनुभव मिळावा हा उद्देश!
विद्यालयातील इ.१ ली ते ४ थीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मुलांनी वडापाव , सँडविच, पाणीपुरी, चनामसाला, इडली सांबर, पकोडे, कुरकुरे, बिस्कीट, चॉकलेट, वडापाव, पेरू, पोहे, चिवडा, भेळ, केळी, कांदे व खेळणी इत्यादी स्टॉल लावून खरेदी - विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. पालक बंधू भगिनींनी मोलाचे सहकार्य केले. जवळपास ७००० ते १०००० रुपयांपर्यंत व्यापार झाला. मुलांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला.
या मेळाव्यास विंचूर पंचक्रोशीतील असंख्य नागरिकांनी हजेरी लावली.
प्रास्ताविक मुख्याध्यापक खैरनार डी.एन.यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजितजी गुंजाळ व सुनीलभाऊ मालपाणी यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी शेतकरी नेते शंकर दरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल दरेकर. माजी प्राचार्य काकळीज सर, प्राचार्य श्री. देवढे सर, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर श्री. चांदे सर, आबासाहेब दरेकर, माधवराव धात्रक व इतर शिक्षण प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. पवार व्ही. एन. यांनी केले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन गायकर एल. बी. व सौ. खोंडे पी. आर. यांनी केले तर आभार श्री. गांगुर्डे एस. एस. यांनी मानले.
या कामी सर्व शिक्षक वृंद व पालक बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले. उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.


